पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विनिद्रता आणि विषयसंसर्गत्याग. २५९ आणि ज्याप्रमाणे त्यांच्या रोजच्या क्रमांत जेवणाला जागा नव्हती. त्या- प्रमाणे निद्रेलाहि नव्हती. ते जर निजत असतील तर पहांटे ५ वाजायचे पुढे व तेहि ७ वाजेपर्यंतच. पण एवढीशी झोंप म्हणजे जवळ जवळ विनिद्र स्थितिच ! ह्या विनिद्र स्थितीत त्यांनी शेवटची तीस वर्षे घालविलीं ! तीस वर्षपर्यन्त निरन्न आणि विनिद्र राहणें म्हणजे लहानसहान गोष्ट नव्हे ! निद्रा व आहार ह्यांचा संबंध नसला म्हणजे विषयांना आयताच फांटा मिळतो ! सकाळी ७ वाजल्यापासून तो पहांटे ५ वाजेपर्यंत जनता व जना- र्दन ह्यांचे सेवेंत जो एकसारखा वेळ घालवीत असे त्याचे आयुष्यांत विषयांना अवसर मिळणार कोठून ? अशा पुरुषाचे पुढें विषयांची होळीच व्हायची ! अण्णासाहेबांस एक पुत्र आणि एक कन्या अशी अपत्यप्राप्ति झाल्यावर विषय- संसर्ग त्यांनी अजीबात सोडून दिला आणि तो एकदां जो त्यांनी सोडला तो अखेर- पर्यंत ! पुन्हा आपले मन त्यांनी कधींहि विषयचंचल होऊं दिले नाही. आणि तरी कोणतीही भलतीं ढोंगें न माजवितां व दांभिक संन्यास न घेतां ते अखेर- पर्यंत संसारांतच राहिले. शेवटच्या १५ वर्षांत त्यांच्या पत्नीनें स्वर्गवास केला ! तरी पण अचल वृत्तीनें, समतोल अन्तःकरणानें, प्रेमपूर्वक परोपका- राने व सर्वोज्ज्वल विश्वमयतेनें त्यांनी प्रायोपवेशनांत आपली आयुष्ययात्रा संपविली ! त्यांनीं इहलोकांतून प्रयाण केले त्या वेळीं तें त्यांचें मरण होतें को शयन होतें हेंहि समजले नाहीं ! पण श्रेष्ट जीवांचें असेंच असते ! त्यांस मरण आणि शयन हाँ सारखाच असतात ! किंबहुना विश्वोपकारांत श्रान्त झाल्यामुळे विश्रान्तीकरितांच ते मृत्युरूपी मोठें शयन पत्करीत असतात !

आधुनिक काळांत असा कोण मनुष्य झाला हैं दाखवा ! डॉक्टरीमध्ये एक पैसाही न घेणारा-शेंकडों जीवांवर रोज उपकार करणारा - कामिनी आणि कांचन ही विषासारखों मानणारा एकीकडे एल्. एल्. वी. एकीकडे एल्. एम्. अॅण्ड एस्. अशा दोन्ही अभ्यासांत वरचढपणा मिळविणारा - एक बिल्व कुटुंबभरणार्थ ठेवून एक बिल्व जनतेच्या सेवेकडे समग्र अर्पण करणारा - साधु- त्वाचे सगळे गुण असून कधींही ' साधु ' म्हणून न मिरविणारा-" साधु त्वावर कधीं एक पैही कमावण्याची इच्छा न धरणारा - लोकोपयोगार्थ व परो- पकारार्थ आपला पैसा उदार हस्तानें खर्चणारा - अतीतअभ्यागतांचें व पेपाहु- 33