पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६८ वैद्यकी. काढा सर्व रोगावर सांगत, व लोकांच्या श्रद्धेनें अथवा अण्णासाहेबांच्या तपो- युक्त वाणीमुळे कांहीं तरी गुण येई ! असले अनेक प्रकारचे विचित्र समज • त्यांच्या वैद्यकीसंबंधानें आढळून येत. अण्णासाहेब यांच्या तपश्चर्येसंबंधानें व प्रभाववती वाणीबद्दल कांहींच प्रश्न नाहीं. त्याचप्रमाणे श्रद्धेमुळे औषधांचा प्रभाव होतो, हीही गोष्ट खरी आहे. व त्याप्रमाणे आज त्यांच्या मागेंही त्यांच्या ५११५ काढ्यांवर सर्व प्रकारची वैद्यकी उत्तम चालवीत असलेले लोक कित्येक ठिकाणी आढळतात; परंतु त्यांच्या काट्यांत कांही शास्त्रीयता नव्हती, अथवा भरमसाट पणानें 'यस्य कस्य तरोर्मूलं' असा प्रकार होत असे, हैं मात्र खरें नाहीं. या सर्व गैरसमजाचें कारण इतकेंच कीं, खुद्द त्यांच्यासंबंधी लोकांत पराकाष्ठेचें अज्ञान आहे; म्हणून याविषयों थोडा विस्तृत विचार करणे माग पडलें. पूर्वी सांगितलेंच आहे कीं, डॉक्टरी अण्णासाहेब यांचे गळ्यांत केवळ अनपेक्षितपणे पडली. परंतु एकदां गळ्यांत पडल्यावर तिच्यांत त्यांनी यथा- योग्य प्रावीण्य मिळविलें, मेडिकल कॉलेजमध्ये असतांनाच डॉक्टरी करण्यास सुरुवात केली होती. त्यांची प्रज्ञा आणि कल्पकता यांच्याविषयों डॉ. स्मिथ या अध्यापकाचें तर इतकें उत्तम मत होतें कीं, त्याला स्वतःला एकाद्या रोग्याची स्थिति जरा विचार करण्यासारखी वाटली, तर तो अण्णासाहेब यांस वरोबर घेऊन जात असे, व त्यांच्या सल्ल्याने त्याचें निदान चिकित्साही ठरवी. डॉ. स्मिथ याचा धंदा त्यावेळेस बऱ्याच मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे अण्णासाहेब यांसही कॉलेज वॉर्डमध्ये मिळणा-या तात्पुरत्या अनुभवापेक्षां वैद्यकीचा सर्व तऱ्हेचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थिदशेंतच घेतां आला. आणि खाजगी रीतीनें त्यांनी आर्यवैद्यकाचा अभ्यास केला असल्यामुळे दोघांचा तुलनात्मक अनुभव घेण्याची तेव्हांपासूनच त्यांना संधी मिळाली. आयुर्वेद हा ( Emperical ) आहे किंवा त्यांत अर्वाचीन दृष्ट्याही पूर्ण शास्त्रीयता आहे, हा प्रश्न सप्रयोग सोडविण्याकरितां दोन्ही पद्धतीचे दवाखाने काढून दोनही पद्धतीचीं मासिकें चालविण्याचा आणि आयुर्वेदाच्या प्रसिद्ध अप्रसिद्ध ग्रंथांचें संशोधन करण्यासाठी दोन लाखांचा प्रचंडे फंड उभारण्याचा त्यांनी उपक्रम केला होता, हें पूर्वी सांगितलेच आहे. डॉ० स्मिथशीं या संबं धानें त्यांचा वाद नेहमींच होत असावा व चांगल्या मोठमोठ्या व केवळ