पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७८ वैद्यकी. मिळत नाही, म्हणून व्यायाम होत नाहीं' ही ओरड सर्वांशीं खरी नव्हे. व शरीरपुष्टाकरितां अंडी, मांस. कॉडलिव्हर अथवा स्टर्न्स वाईन, यांचीच आवश्यकता आहे हे म्हणणेही भ्रामक आहे, असे दिसतें. थोडेसे भुइमुगाचे दाणे अतिशय संथपणानें चावून जर सकाळी खाल्ले, व त्यावर ताकाचा एकादा सुंदर पेला चढवून दिला, तर जो परिणाम होईल त्यापुढे कॉडलिव्हर कांहींच नाहीं, अर्से ते प्रतिज्ञेनें सांगत. नारळ वगैरेंच्या पौष्टिकपणावद्दलही असेच त्यांचें मत होते, आणि जोपर्यंत असे पदार्थ इकडे मिळतात, तोपर्यंत त्यांचा फायदा कुशलतेनें घेण्याऐवजीं, कॉडलिव्हरसारखी औषधें घेणे त्यांना कसेंसेंच वाटें. असो. कार आजच्या पिढीचा शारीरिक हास, त्याला कारणीभूत असलेली व त्यापासून उत्पन्न होत असलेली व्यसनें, त्यामुळे प्रगट होणारे तऱ्हेतऱ्हेचे अनेक रोग, आणि विशेषतः स्त्रीवर्गात वाढत असलेल्या प्रदर व तत्संबंधी अनेक रोगाचे प्रमाण यामुळे त्यांचा जीव तुटत असे, व त्याविषयी आपले विचार ते नेहमी बोलून दाखवीत. उठल्यासुटल्या वैद्याकडे धांव घेण्याची व औषधांवर भर ठेवण्याची जी प्रवृत्ति वाढत आहे, तिचा तर त्यांना फारच खेद होत असे. चांगल्या चांगल्या म्हाताऱ्यांनाही एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून औषध मागतांना पाहून त्यांना मौज वाटे व 'आतां औषध कशाला पाहिजे ? दूध प्या, निंवाचा पाला खा, ' असे म्हणून वैराग्यमार्गाकडे त्यांना वळवि- ण्याची ते खटपट करीत. स्त्रीवर्गात आजकाल वाळंतरोगाचा जो सरसहा फैलाव दिसत आहे, त्याचें मुख्य कारण ते अर्से सांगत की बाळंतपणें हीं नव्या जुन्या कोणत्या तरी शास्त्रीय पद्धतीनें न होतां कशीं तरी होतात, प्रसूतीनंतर पोट बांधून ठेवणें हें आजकालच्या नवीन मुलांना त्रासदायक, गैरसोईचें, अथवा कसेंसेंच वाटतें. वडील माणसांचा धाकही बेताचाच असल्यामुळे अथवा वडील माणसांसही त्याचें महत्त्व कळेनासे झाल्यामुळे, एक तर पोट दोन अडीच महिने सारखें बांधले जात नाहीं, अथवा कोठे बांधलें तरी जसें पाहिजे तसे बांधले जात नाहीं, व त्यामुळे आंतील यंत्रें ढिली होऊन जातात. ( Dilation of Stomach ) त्याच्यायोगानें अपचन, यकृतासंबंधाचे अनेक विकार, व इतरही स्त्रियांचे अनेक रोग उत्पन्न होऊन त्यांचा बाळंत-