पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काढे सांगण्याची पद्धति. २७९ रोगांत परिपाक होतो. ह्या साध्या गोष्टींचे त्यांना अतिशय महत्व वाटत असावेंसें दिसतें. आणि म्हणूनच ती स्त्रियांनी लक्षांत ठेवण्याजोगती आहे. अलीकडे पुष्कळांना पोट कसे बांधावें हें देखील कळत नसते, त्यामुळे ते स्वतःच चौकोनी रुमालाची घडी घालून बांधून दाखवीत. असो. पूर्वी सांगितल्याप्रमाणे काष्ठीषधीच त्यांच्या एकंदर धोरणांत बसल्यामुळे त्यांचाच उपयोग करूं लागल्यामुळे लोकांस एक मोठीच अडचण भासूं लागली. काष्टौषधी जंगलांतून आणावयाची खटपट जरी सोडली, तरी तिची ओळख असणे कठीण. त्यामुळे बाजारांत जशी मिळेल तशी ती घेणें अवश्य होते. व काष्टौषधी तर होतां होईल तो ५१६ महिन्यांपेक्षां जुनी असूं नये. त्यामुळेही काढ्यांचा गुण यावयास वेळ लागे. पुढे पुढे त्यांच्याजवळ औषधें लिहून देण्यास बसणारे भिषग्रत्न गंगाधरशास्त्री जोशी यांनी आपल्या सर्वौषधी- संग्रहालयानें ही अडचण थोडीफार दूर केली होती. व स्वतःच्या दुकानांतील वनस्पतींचा सांठा ४।४ महिल्यांनीं ताजा ठेवावयाची ते खबरदारी घेत. त्यामुळे ' स्वार्थाय च सुखाय च' या त्यांच्या तत्त्वाप्रमाणे त्यांचा स्वार्थ साधून लोकांचाही थोडी सोय झाली. तरी पण एकंदरींत ही अडचणही मोठीच होती. एवढ्या- करितां अण्णासाहेब यांनी लोकांच्या साधारण परिचयांत असलेल्या ५।२५ साध्या वनस्पतींवरच होतां होईल तो काम करण्याचा प्रघात ठेवला होता; आणि त्यामुळेच अण्णासाहेब यांचे शेंदोनशे काढे पाहिले, तरी त्याच ५/२५ द्रव्यांचा सारखा उपयोग दिसून येतो, व ५/१० औषधें तर कोणच्याही काठ्यांत अगदीं हटकून तींच आढळून येतात. उगीच कोठें तरी दोनचार पदार्थांचा फरक केलेला दिसतो. ' अण्णासाहेब यांच्या वैद्यकींत अलीकडे शास्त्रदृष्टया कांही अर्थ राहिला नव्हता, साधूचा प्रसाद म्हणून श्रद्धेनें औषध घ्यावें इतकेंच, ' असा जो प्रवाद आढळून येतो, त्याचें कारण हेच आहे. त्यांचे काढे कोणच्याही ग्रंथांत आढळणे शक्य नाहीं, ते सर्व ते नवीनच वसवीत, व त्यामुळे औषधें सांगतांना क्वचित्प्रसंगीं जास्त विचारांत पडल्याचेही दिसत. हातानें ते कवींच कोणाला औषध देत नसत, तोंडानें यांनी औषधे सांगावीं, व कोणीतरी लिहून घ्यावीं असे चाले. अर्शी औषधें सांगतांना मधेच एकादे वेळेला बराच वेळ ते स्वस्थ रहात, अथवा दुसऱ्या कोणाशीं कांहीं बोलत चसत. इतर लोकांस अर्थातच