पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ चातुर्वर्ण्य. प्रतीति हैं मानवी जीविताचें आणि सर्व विश्वव्यापाराचें अंतिम ठरलें. त्याचा प्रतिसिद्धांत म्हणून हॅहि सहज ठरलें कीं, कोणासही या जगांत एकट्याचें हित या अंतिम ध्येयाच्या दृष्टीने सर्व जगांस सोडून एकटेंचं करून घेतां येणार नाही; आणि म्हणूनच यच्चयावत् सर्व अस्तित्व परस्पराश्रयी असल्यामुळे 'पर- स्परं भावयंतः श्रेयः परमवाप्स्यथ ' हाच शेवटी श्रेयाचा रस्ता ठरला. 'एक- मेवाद्वितीयम् ' असे जे कांहीं अनिर्वाच्य असेल, त्याच्या आणि या इंद्रियगो- चर विश्वाच्या मधें अगोचर अशा अस्तित्वाच्या, सूक्ष्म सूक्ष्मतर पायऱ्या आहेत, आणि ' परस्परं भावयंतः' अशा रीतीनें या अंतिम ध्येयाची सर्वांसच आणि सर्वांमिळती व्यक्तीस प्राप्ति व्हावयाची, म्हणजे ह्या सूक्ष्मतर अस्तित्वकोटी विसरून चालावयाचें नाहीं. ह्या सर्वांनी परस्परांस धरून यत्न केले असतां सर्वांसच, आणि अर्थात् त्या मिळती व्यक्तीसही त्या ध्येयाची अढळप्राप्ती लव- करच होईलं. यावरून त्या शास्त्रकारांनी असा तिसरा सिद्धांत सांगितला को, • व्यक्तींस विश्वाकरितां काम करतां येतें. असे काम व्यक्तीस करतां यावें, विश्व आणि व्यक्ती यांचा मृत्यूशिवाय न उघडणारा परस्वाधीन पडदा निघून जाऊन स्वाधीनतेनें उभयतांत दळणवळण सुरू व्हावें, आणि येवढी उच्च पायरी प्रत्येक व्यक्तीस जरी गाठतां आली नाहीं, तरी प्रत्येक व्यक्तीची सर्व क्रिया अशी व्हावी कॉ, तिच्या योगानें, परस्परांस उपयोग होऊन श्रेय मिळावें. केवळ भौतिक जडेंइद्रियव्यापारांनी ही गोष्ट घडणें सर्वथा शक्य नाही. यास मानवी शरीरांत ज्या अतिमानुष शक्ति क्रिया करतात, त्यांचेंच साह्य घेतले पाहिजे. आणि जेणेकरून तें होईल असेंच मानवी शरीर वागलें पाहिजे. अथवा अण्णासाहेबांच्याच शब्दांत सांगावयाचें म्हणजे The root principle of the transendental science, is the drowning & merging of individualism, including all the Concomittant notions of separation, exclusiveness and the like, into the active universal whole; and to teach the methods by which conscious communication can be establi- shed between the groups of Powers as exhibited in the outer world on the one hand and the inner world of knowledge, on other hand, such knowledge being in part exhibited by a condition of ( एकमेवाद्वितीयम् ) At man, or