पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. बाल्य. म्हणून दाखविलें.' एवढ्या छोट्या वयांत भूत आहे असे कळून देखील त्यांना ' . मुळी देखील भीति वाटली नाही, उलट गंमत वाटली. याचप्रमाणे एकादी गोष्ट कठीण म्हणून तिचा नाद सोडणें ही कल्पनादेखील. कधीं त्यांना शिवली नाही. उलट समर्थांच्या उक्तीप्रमाणें 'कानडेंचि अभ्या सावें, ' असा प्रसंग आला ह्मणजे त्यांना दुप्पट अवसान येई. त्यांचें सारें आयुष्य अशा प्रकारच्या कटाकटीत गेले. इंग्रजी शाळेत शिकावयाला गेल्या- नंतर लवकरच असा प्रसंग आला कीं, जो कोणी दोन इयत्तांचा अभ्यास करील त्याला ६ महिनेपर्यंत शाळेत न येण्याची परवानगी होती. यांनी पाहिलें, ठीक झालें; तितकेंच झाले. पुढे परीक्षेचे वेळी हे तिसरीच्या मुलांत जाऊन वसले. परंतु मास्तरशी यांच्या नेहमीं कटाकटी चालत. त्यामुळे त्यांची त्यांच्यावर प्रीति नव्हती. त्यांना अर्थातच ही गोष्ट पसंत पडली नाही. त्यांनी यांना तेथून उठून दुसरीचे मुलांत बसण्यास सांगितलें. तेव्हां अर्थातच मोठी कटाकट होऊन ती गोष्ट कर्फहॅम साहेबांचे कानावर गेली. साहेब मजकुरांस तंटा काय आहे तें कळल्यावर सहज विनोद करण्याकरितां त्यांनी म्हटलें कीं 'तूं मोठा उद्धट दिस- तोस. जर तूं तिसरीचे परीक्षेत नापास होशील, तर तुला उलट पहिलीत बसवीन, ' अण्णासाहेबांनी उत्तर दिले 'अर्से कसें ? हा तर अन्याय आहे. फार झाले तर दुसरींत बसवा, परंतु तशीच तुमची इच्छा असली तर होऊन जाऊं. द्या, मी तयार आहे. ' पुढें परीक्षा घेतली. तेव्हां Howard चे पुस्तक. होते. त्यांतील प्रश्न विचारतांना कांहीं नियम पाठ ह्मणावयाचा होता, व साहेबबहाद्दर मुद्दाम कसून तो पुस्तकाबरहुकूम आहे किंवा नाही हें पहात होते. होतां होतां त्यांत कोठें Being शब्द आला. तेव्हां त्यांनी सांगितलें, ' साहेब, पान उलटा; Being चें ing सतराव्या पानावर आहे. यामुळे चोहोंकडे एकच हंशा पिकला. खुद्द साहेबांसही त्यांच्या अचुक स्मरणाचें व तेजस्वितेचें कौतुक वाटून त्यांनाही हंसूं आलें, व त्यांनी परीक्षा पुरी करून त्यांस शाबासकी दिली. , त्या वेळच्या साहेव शिक्षकांच्या व परीक्षकांच्या पुष्कळ मौजेच्या गोष्टी अण्णासाहेब सांगत. But for & moment and Boby was dead, हें. बाक्य भाषांतरित करतांना एका वर्गांत कशी मौज झाली, तें ते मोठ्या मौजेनें सांगत. ' एका पळाचा उशीर कीं, बोबी मेलाच होता' असे