पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लोकपालक ब्राह्मणांचा विहिताचार. ऋणानि त्रीण्यपाकृत्य मनो मोक्षे निवेशयेत । अनपाकृत्य मोक्षं तुं सेवमानो व्रजत्यवः ॥ ' मनु० हैं महातत्त्व सांगून जेणेकरून उत्तम रीतीनें अनृणी होतां येईल, अशी आश्रम- व्यवस्था लावून दिली. या आश्रमव्यवस्थेत गृहस्थाश्रम आणि त्यामुळे समाज व राज्य वगैरे सर्व आल्यामुळे ब्रह्मविद्येच्या तत्त्वावर म्हणजे 'आत्मौपम्येन सर्वत्र' या तत्वावर अनेक प्रकारची शास्त्रें उत्पन्न करून दिली, आणि ही समाजव्यवस्था अखंड टिकावी म्हणून तिला, अतींद्रिय जगांतून शक्तीचा पुरवठा करण्याक- रितां वेदपठणाचा कारखाना काढून दिला. हा कारखाना सर्वांच्याच माल- कीचा असून सर्वांवर त्याचीही सत्ता आहे म्हणून 'लोकपालक ' ब्राह्मणांनी स्वतःकरितां अशी एकही क्रिया न करितां, केवळ वेदपठण आणि त्यास योग्य असे प्रकृतिस्थ शरीर रहाण्यास अवश्य अशी राहणी हीं संभाळून रहावें, हें ब्राह्मणांचें कर्तव्य ठरलें. या राहणीचे मुख्य भाग दोन होते. एक तर, वेद- पठणास योग्य अशा रीतीनें शरीर प्रकृतिस्थ ठेवणें; हे त्यांनी ब्राह्मणांचें नित्य- कर्म, आचार, आणि षोडशसंस्कार यांच्या साहाय्यानें घडवून आणलें; दुसरे- ही शरीराची परंपरा चालण्याकरितां गृहस्थाश्रम म्हटला म्हणजे वित्तादि अनेक बाह्य साधनांची जरूर असल्यामुळे आणि पौरोहित्य हे त्यांच्याकडे देऊन, त्यांनी सर्वांच्याच उपयोगी पडावें असें ठरवून दिले. याच्या उलट, ब्राह्म- णांचें तेज कमी होणार नाहीं, अशा रीतीनें समाजावर त्याची जबाबदारी टाकली. अग्नीनें मनुष्याची कार्ये करावयाचीं, आणि माणसांनी अग्नी प्रज्वलित ठेवावयाचा, अशी ही व्यवस्था आहे. 6 ८ 66 यांच्या खालोखाल स्थान, ज्यांना वेदानें ब्रह्मविद्येची पात्रता येऊं शकेल, अशांचें आलें; कारण ब्रह्मविद्येची पात्रता अभयं सत्वसंशुद्धिः इत्यादि दैवी गुण असल्याखेरीज येणे शक्यच नाहीं. यांनाही वेदाच्या साह्याने स्वतःच्या शरीराची पात्रता वाढवून ब्रह्मरूप होतां येणे शक्य होतें; परंतु त्या वेद- वाणीने इतरांचे कल्याण व्हावें, अशी ती वीर्यवती नसल्यामुळे अथवा अनर्थकारक असल्यामुळे घेण्याचें कारण नव्हतें; तेव्हां अर्थातच अनुच्चारित वेदवाणीनें स्वतःचा फायदा करून घ्यावा, आणि इतर शक्तींचा उपयोग समाजाचें हित चितण्यांत आणि रक्षण्यांत करावा, असें करीत असतां, साधल्यास सर्व तऱ्हेचे सुखोपभोग ब्रह्मसरूपतेस अनुकूल होतील, असे स्वाधीनतेनें घ्यावे, नाहीतर जीविताचीही