पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ चातुर्वर्ण्य पर्वा करूं नये, हें क्षत्रियांचें कर्तव्य ठरलें; आणि त्याला योग्य असेच संस्कार व शिक्षा त्यांना लावून देण्यांत आली. ब्रह्मविद्येची पात्रता यावी एवढ्या मोठ्या कार्यास वेदमार्गाप्रमाणें ज्यांची शरीरें लायक नाहीत, परंतु वेदसाम- र्थ्यानें सर्व प्रकारचे धर्मास अविरुद्ध असलेल्या उपयोगांनी वासना आणि इंद्रियें हीं तृप्त करून इतर मार्गांनी ज्यांना ब्रह्मसारूप्य मिळवितां येईल. अशा वर्गास वैश्य हें नांव दिले आणि म्हणून या दोघांस वेद शिकण्याचा अधिकार आला, 'शिकवणे माल शक्य नव्हतें.. या नंतर वेदवाणीचा ज्यांना कोणचाच उपयोग होऊं शकत नाही, परंतु दुसऱ्यांनी त्यांच्याकरितां वेदविहित कार्य केले असतां फायदा होतो, आणि इतर मार्गांनी ब्रह्मविद्येचे अधिकारी होऊं शकतात, असा वर्ग आला. यांना ऐहिकसुखोपभोग व इतर मार्गांचे रहस्य हीं दोन्हीही प्राप्त व्हावी म्हणून स्वतःच सर्व प्रकारची धडपड करणें भाग आहे. म्हणून त्यांच्या- कडे परिचर्यात्मक कर्म आलें. याप्रमाणें या नाही त्या रितीनें ब्रह्मविद्येची प्राप्ती होऊं शकेल, अशी शरीरें 'निवडून काढून त्या शरीरांची वीजतः परंपरा कायम राहील, अशी राहणी आणि संस्कार ठरवून टाकले. आणि इतकेंहि करून सृष्टीच्या अर्वाक्स्रोततेमुळे परंपरेमधें जो कांहीं कमीपणा उत्पन्न होतो तो आश्रमसंस्था व तिला अनुस- •रून सारी समाजव्यवस्था बसवून ब्रह्मचर्य, गृहस्थ, इत्यादि आश्रमांतील अवश्य असलेल्या तपानें भरून निघावा, अशी व्यवस्था केली. या व्यवस्थेत ही गोष्ट लक्षांत ठेवण्याजोगी होती की, त्यांनी ठरविलेलें परमकल्याण करून घेण्यास कोणासही मनाई नव्हती, अथवा ब्राह्मणाखेरीज इतर कोणास कोणच्याही तऱ्हेची ऐहिक सुखें उपभोगण्यास अडथळा नव्हता; उलट ज्या रीतीनें सुखो- पभोग घेतला असतां इंद्रियें आणि वासना यांची खरी तृप्ती होऊन मनुष्याची ओजोहानि होत नाहीं आणि पूर्ण यत्न केला असतां ब्राह्मणाप्रमाणेच जीव- न्मुक्ति मिळवतां येते, अशा रीतीनें सुखोपभोग घेण्यास सांगून त्यांचा मार्ग जास्त सुलभ करून ठेविला. सुखोपभोगाचें साधन ज्या वेळेस विद्या हें नसून शौर्य आणि संपत्ति हेंच होतें, अशा वेळेस अपवादात्मक उदाहरणे सोडलीं तर ढुंगणाखाली खंदा घोडा घेऊन जरीफेट्याच्या झोकांत भाल्याची फेंक करणे सोडून, बळेच घोकंपट्टींत डोके खुपसणें कोणास आवडणार ? राजसभेमध्यें मिळणाऱ्या शालजोडीपेक्षां शूर म्हणून सुंदर स्त्रियांनी केलेली ओंवाळणी को-