पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हा ध्येयाचा प्रश्न होता. करतां येतें, हा सिद्धांत, पुनर्जन्म आणि इंद्रियजय इत्यादि ब्रह्मविद्येच्या अंग- भूत असलेल्या सिद्ध गोष्टींवर चातुर्वर्ण्याची इमारत उभारली आहे. या गोष्टींत ज्यांचा विश्वास नसेल त्यांची गोष्ट अलाहिदा आहे; परंतु या गोष्टी मान्य नसणारा मनुष्य वैदिकधर्मी नव्हे, आणि म्हणूनच त्याला चातुर्वर्ण्याचे महत्त्वही नाहीं. परंतु जे वैदिकधर्मीच ह्मणवीत असतील त्यांना ती तत्त्वें मान्य असलींच पाहिजेत. म्हणून चातुर्वर्ण्यसंस्था सुधारण्याच्या तात्पुरत्या भरांत आपल्या एकांगी विद्वतेनें तिची वाटेल तशी उपपत्ति वसवून, तिचें खरें महत्त्व घाल- वर्णे त्यांना योग्य नाहीं. आतां ही गोष्ट खरी आहे कीं, राष्ट्राच्या एकंदर अधःपाताबरोबर या संस्थेचेंही रूप विकृत झाले आहे, आणि तें सुधारून नीट घडी बसवली पाहिजे. परंतु त्यांतील हे मूळ धोरण लक्षांत ठेऊन सुधारणा केली पाहिजे, यावर अशी शंका येते कीं, जरी चातुर्वर्ण्य एकाकाळी अत्यंत उपयुक्त असले तरी आज ते उपयुक्त नाहीं; पण हा प्रश्न वेगला आहे. त्याचा संबंध ध्येयाशी येतो स्वरूपाशीं येत नाही. राष्ट्राचें ध्येयच जर पालटले असेल तर, त्या दुसन्या ध्येयाच्या प्राप्तीस चातुर्वर्ण्य उपयोगी पडेल किंवा नाहीं ? हा प्रश्न सोडवणे कठीण आहे. मुद्दा एवढाच आहे कॉ, जर तेंच ध्येय ठेवाव याचे असेल, तर या संस्थेचें रक्षण केले पाहिजे. आणि जर तें ध्येय नको असेल, तर चातुर्वर्ण्य सोडून द्या. परंतु चातुर्वर्ण्य सुधारण्याच्या नांवाखाली साराच सांवळा गोंधळ करूं नका. देशांतील एकी चातुर्वर्ण्यामुळे अडून बसली आहे, ही कल्पना पुष्कळ अंश भ्रामक आहे, आणि परक्या लोकांनी उत्पन्न केलेल्या राजनीतिमूलक अनेक भूतांपैकी हें एक महाभूत आहे. शास्त्रीय विष- यांत तडजोड होऊं शकत नाहीं. एकाद्या मात्रेस अमुक प्रकारची औषधें आणि प्रयोग सांगितला असतां तेथें जशी तडजोड नाहीं, तसाच हाही प्रश्न आहे. o याच्यावर ठराविक प्रश्न असा येतो कीं, आतां तशी प्रकृतिस्थ शरीरें कोणाचींच नाहींत. तेव्हां चातुर्वर्ण्य मोडून सनर्णता कां करूं नये; आणि असल्या शरीरांनी पूर्वीचा हेतु साधत नसल्यामुळे, त्यांच्या मागे लागण्यांत काय अर्थ आहे ? याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, उच्चवर्णांनी आपली सहजप्राप्त श्रेष्ठसाधनसंपत्ति सोडून शूद्रत्व पत्करावें; कारण किर्ताही अधःपात झाला असला तरी, इतर वर्णांच्या मानानें आणि शुद्रांच्या मानानें उत्तरोत्तर