पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मांसाशन. भा ऐसाशन हा राष्ट्रापुढे एक नवीन प्रश्न उत्पन्न होऊं पहात आहे. मांसा- शन करणें हें सशास्त्र आहे किंवा कसे? योग्य आहे की अयोग्य आहे ? आणि आवश्यक आहे की अनवश्यक आहे ? असे यांत तीन मोठे प्रश्न आहेत. सशास्त्र आहे किंवा कसे याचा अर्थ असा की ब्राह्मणांचा ब्राह्मणपणा म्हणून जो कांहीं आहे म्हणून शास्त्रे सांगतात, त्यास मांसाशन हैं विरुद्ध पडतें कीं काय, आ.ण विरुद्ध आहे असे शास्त्रांत सांगितले आहे की काय ? त्याचप्रमाणे जरी विरुद्ध आहे असे ठरले तरी एकादे वेळेस आपाततः अथवा औषधी- सारख्या उपयुक्ततेकरतां वगैरे जर त्याचें क्वचित् किंचित् सेवन झालें, तरी देखील ब्राह्मणाचा ब्राह्मणपणा नाहींसा होतो की काय ? आमच्या इकडील पौरा- णिक वैदिक वगैरे सर्व वाजायांत पूर्वीचे ऋषि आणि ब्राह्मण मांस खात अस ल्याचा उल्लेख सांपडतो; अशा स्थितींत मांसाशन हें ब्राह्मणास विरुद्ध आहे, अशी कल्पना कां करावी ? आणि बुद्धधर्माचा संसर्ग वगैरे आगंतुक कार- णांनीं जर ती आली असली, तरी तिला तसेच चिकटून कां रहावें ? असा हा सरळ प्रश्न आहे. तें योग्य आहे कीं अयोग्य आहे, याचा अर्थ जरी शास्त्र- दृष्टी सोडून दिली, तरी सृष्टिशास्त्र आणि वैद्यशास्त्र यांच्या दृष्टीनें तसें हितावह आहे किंवा कसें ? आणि तिसऱ्या प्रश्नाचा सरळ अर्थ असा आहे की हल्लींच्या आमच्या परिस्थितीत राष्ट्राच्या प्रगतीस त्याची आवश्यकता आहे किंवा काय? अथवा, अगदी आवश्यक नसूनही सुरू केले तर तें थोडें बहुत हितावहच होईल कां घातुक होईल ? अशा या प्रश्नाच्या तीन बाजू आहेत. याविषयीं थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे अण्णासाहेब यांचें मत अत्यंत " विरुद्ध होतें; इतकेंच नव्हे तर ती कल्पनाही त्यांच्या मनास दुःसह होत असे. त्यांचे म्हणणें अर्से होतें कीं, मांसाशन हे विश्वकुटुंवत्वाच्या भावनेस स्वभाव- तःच इतकें विरुद्ध आहे की, त्याची आणि ब्रह्मविद्येची सांगड घालणे अशक्य आहे. पुराणांत वगैरे जी माहिती आहे ती शेकडों वर्षांच्या इतिहासाचा आणि अध्यात्म, योग तंत्र वगैरे शास्त्रांचा संकर आहे. आणि तेथें ही मांस खाण्याची उदाहरणे फक्त ऋषींच्या विषयींच आहेत; आणि त्यांची उदाहरणें चातुर्व-