पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ मांसाशन. पर्याच्या मर्यादेतील ब्राह्मणास लावून चालावयाचें नाहीं. कारण, ऋषि हा मूळ कोर्णाही असला तरी, ज्याचे शरीर कणशः ब्रह्मशक्तियुक्त आहे, असा प्राणी असल्यामुळे चातुर्वण्यांतूनच बाहेर गेलेल्या चतुर्वर्णांतीत परमहंसाप्रमाणे होय. ऋषींच्या खेरीज करून ब्राह्मणांच्या मांसाशनाची उदाहरणें कोठेंही नाहींत.. यज्ञयागांत पशुहिंसा करून मांस पुरोडाश भक्षण करण्याचे, आणि गवालंभन वगैरे विधि यांचे उल्लेख सांपडतात; त्यावरून त्याकाळी सर्रास मांसाशनाची पद्धत होती, असे वाटतें; पण तें चूक आहे. गवालभन अथवा पलपैतृक यांची चालही कांही मिन्न कारणामुळे अस्तित्वांत होती. पूर्वी अनुलोम विवाह असल्याकारणानें ब्राह्मणाच्या अनुलोमज संगतीनें आपल्या मातृपक्षीय पितरांना मांसपिंड द्यावे लागत, म्हणून पलपैतृक प्रचारांत आलें. अनुलोमविवाह निषिद्ध ठरतांच पलपैतृकही वर्ज झालें. यज्ञयागांतील हिंसा ही वस्तुतः हिंसाच नव्हती. कारण मूळ यज्ञसंस्था ज्या हेतूनें उत्पन्न झाली तो असा की, त्याच्या योगानें संजीविनी वगैरे विद्यांची प्रत्यक्ष प्रतीति लोकांस द्यावी. मानवी शरीर म्हणजे अर्थात् आंतील लिंगदेह हा, देवताघटित आहे. इंद्रादिक देवता या वस्तुतः विष्णु, शंकर, राम यांच्या सारख्या व्यक्ति नसून विश्व चालविणाऱ्या भिन्न भिन्न प्रकारच्या शक्तीचे समु- चय होत. विश्वांतील यच्चयावत् क्रियाशक्ति म्हणजे इंद्र, अशाच प्रकारें सविता प्रजापति वगैरे देवता होत. सूर्य बारा आहेत, म्हणजे ज्या एका तेजोत्पादक शक्तीस सूर्य म्हटलें, ती शरीरांत आणि विश्वांत बारा प्रकारांनी काम करते. या सर्व शक्तींना बाहेर प्रगट होण्यास मुख्य साधन म्हणजे मनुष्याचा लिंग- देह; कारण हा लिंगदेह परिणत झाला असल्यामुळे त्याच्या द्वारें बाहेर प्रगट होऊं शकतात, म्हणून मनुष्याचें शरीर मध्यवर्ती असलेल्या सांध्याप्रमाणे या जडाजड विश्वांत अतिशय महत्त्वाचें होऊन बसलें, आणि सर्व प्रकारच्या उन्न- तीस आश्रयस्थान झाले. पशूंचे लिंग शरीर हें असें परिणत नसल्यामुळे अव यव पृथक् पृथक् न वाढलेल्या गर्भपिंडासारखी त्याची स्थिति असते. उत्क्रांति- क्रमामध्ये अनेक योनीतून जात असतां हळू हळू हा लिंगदेह पूर्ण व्हावयाचा. असा तो पूर्ण झाला असतां मानव सृष्टीत एका जिवाची भर पडल्यामुळे, म्हणजे स्वतःस एक नवीन कार्यक्षेत्र मिळाल्यामुळे इंद्रादि सर्व दिव्य शक्तीस आनंद व्हावा, हें साहजिक आहे. याचा अर्थ असा कीं, तितका उत्तम कर्माच 1