पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाल्य. १३ परंतु त्यामुळे अधिकच थट्टा होऊन कोणीतरी अंगावर रंग टाकला. त्यासरशी त्यांचे पित्त एवढें खवळले की त्यांनी टरकन् अंगावरचा शेला फाडून पुढे टाकला ! तेव्हां सर्वजण विस्मित होऊन स्तब्ध बसले. यांचे बाल्यप्रकरण संपवून जातां जातां त्यांच्या मातोश्रीच्या अधिकारा- विषयीं दोन गोष्टी सांगितल्या तर विशेष विषयातिक्रम होईल असे नाहीं.. म्हणून त्यांच्या ध्यानयोगसिद्धीच्या २|३ गोष्टी पुढें देतों. बंडाचे वेळीं इकडील मंडळींना मोठीच तळमळ लागून राहिली होती.. परंतु तिकडील बातमी कळण्यास मार्ग मात्र कांहींच नव्हता. त्यामुळे त्यांना वाईट वाटू लागले. तेव्हां जानकाबाईंनी सांगितलें ' चिंता करूं नका, मी तिकडील बातमी सांगतें.' आणि ध्यानस्थ होऊन सर्व वृत्तांत त्यांनी सांगितला. पुढें तिकडून बातम्या पर्ने वगैरे आलीं, तों तें सर्व खरें ठरलें ! त्यावरून मोठे कौतुक वाटून लोक त्यांना पुन्हा पुन्हा प्रश्न करूं लागले. हा एक उप- सर्गच त्यांना झाला. तेव्हां एक दिवस जवळ पडलेला एक आरसा घेऊन त्या म्हणाल्या की, 'फिरून मला त्रास देऊं नका. जे कांही हवें असेल, तें हा आरसा सांगेल. याला धूपदीप दाखवून यांत पहात जा, म्हणजे झाले. सर्व कांहीं त्यांत दिसेल. ' आणि खरोखरच त्यांत तसे दिसत असे. ही गोष्ट स्वतः अण्णासाहेबांनी सांगितला. जानकीबाईचे मरणानंतर तो आरसा कांहीं दिवस त्यांचेजवळ होता. पुढे एकदां कोणाच्या तरी हलगर्जीपणानें तो फुटला, व त्यांतील गुण नाहींसा झाला. १ असा गांवांत एक गरीबाची म्हातारी होती. तिच्या मनांत काशीयात्रेला जाण्याची इच्छा होती. पण दारिद्र्य म्हणत होते ' मी. ' तेव्हां जाणार कशी? तेव्हां तिनें रोज गुंडांच्या श्रीगणेशाची प्रार्थना करण्वी कीं, 'देवा जानकीबाई पटवर्धनाच्या मनांत, मला काशीयात्रेपुरतें द्रव्य देण्याची प्रेरणा कर. तिचा क्रम एक वर्षभर चालला. शेवटी एक दिवस दर्शनाचे वेळीं मोठा वैताग येऊन तिनें हातांतला गडवा' श्रीचे मस्तकांत घातला | इकडे जानकीबाई ध्यानांत पाहतात तों, कपाळास प्रहारामुळें इजा झालेली ! तेव्हां त्यांनी कळ- वळून ' हे काय ? ' म्हणून विचारलें. एकंदर प्रकार समजल्यावर तर त्यांना फारच वाईट वाटले व त्यांनी ताबडतोब त्या बाईस बोलावून रुपये तिच्या पदरांत घातले, व म्हटलें “ सटवे, हें काय केलेंस ? तुला पैसे पाहिजे.