पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ मांसाशन. परंपरा निर्गत होतात, तेथें त्या परंपरा त्या मूळ सिद्धांतास किती धरून असतात, हें पाहणें, हीच मुख्य कसोटी आहे. त्यांतून संस्कृत वाङ्यायाचा अभ्यास कर णान्यांनी दुसन्याही कित्येक बाबी लक्षांत ठेवाव्या लागतात, आणि न्याय शास्त्रांतील 'अतिदेश' हा मोठ्या काळजीपूर्वक लावावा लागतो. असो. यज्ञांतील मांसाशन हे मांसाशन कां होऊं शकत नाहीं, हें थोडक्यांत सांगणें भाग आहे. वर सांगितल्याप्रमाणे पशुचा देह आणि आंत माणसाचा जाणता जीव अशी परिस्थिती उत्पन्न होणें, म्हणजे त्या जिवाला भयंकर हाल होणें आहे. आणि एकदां अशी परिस्थिति आली म्हणजे त्या देहाचा नाश करणेंच योग्य आहे. आणि म्हणूनच त्याचा वध करून आंतील लिंगदेहास मनुष्यरूपानें जन्मास येण्याची संधि तत्काळ देण्याकरितां केलेली हत्या ही हत्या नव्हे. आणि म्हणूनच ज्या वेळेस असा खरा यज्ञ करण्याचे सामर्थ्य नाहींसें झालें, त्यावेळी पशुहत्या बंद करून पिष्टपशु करण्याचा विधि ठरला. येथे दोन शंका येतात कीं, जरी त्या पशुदेहाचा नाश करणे हेंच योग्य ठरलें तरी आपणच त्याचा नाश कां करावा ? विषम परिस्थितीच्या तापाने पशु स्वतःच तें करणार नाहीं काय ? याचे उत्तर असे आहे की असेंही क्वचित् होऊं शकेल. उदा० मृगयोनीतील जड भरतानें आपले शरीर प्रायोप्रवेशनानें टाकिलें. विषम परिस्थितीत आत्महत्या करणारी माणसेंही आढळतात. परंतु शरीराची आसक्ति इतकी जबरदस्त असते कीं, कांहीही झाले तरी तें टाकवत नाहीं; आणि विपत्तिआणि क्लेश यांनीं गांजून जाऊन डोळ्यांतून सारखें पाणी काढीत असतांही शरीर टाकण्याचा वीर होत नसलेलीच संख्या जास्त असते. साहसानें शरीर टाकल्याची उदाहरणे माणसांतही अपवादात्मकच होत. म्हणून त्या शरीराचा नाश करणें हें उपकारच आहे. अशा उपकारकत्वाचें निश्चितज्ञान असल्या- खेरीज मात्र कोणीही स्वतःची अथवा दुसऱ्याची हत्या करणे, हें पाप होय. कारण क्वचित् प्रसंगी तें उपकारक ठरलें तरी बहुतांशी दुसन्यास आणि त्यामुळे परिणामी आपणासही अनर्थावहच आहे. दुसरी शंका अशी की, जरी अशा रीतीनें पशुहिंसा ही योग्य ठरली तरी देखील तो पशु स्वतःच खाण्याची आवश्यकता कां? त्याचें कारण असे आहे की, मनुष्य- शरीरांत कोणचाहि संस्कार अथवा शक्ति म्हणजे अर्थात् त्याच्या बुद्धीत तो सस्कारं घालण्याची अथवा वाढविण्याची मुख्य साधनें तीन आहेत. एक तर