पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्युत्पत्तीचे प्रचलित नियम सदोष आहेत, पुन्हां जिवंत करणे, 'स्व' म्हणजे उ आणि अ ( अर्थात् कंठापर्यंत उच्चारली जाणारी सर्व वाणी ) यांच्या झणजे वाणी नसलेला असा आत्मा, म्हणजे • The active state of the soul ', अशा प्रकारच्या व्युत्पत्त्या ते सांगत असत. अशा प्रकारचा नज् अर्थी 'स' कित्येक इंग्रजी शद्वांच्या व्युत्पत्तीत सांपडतो. त्याचें उदाहरण म्हणून ermall शद्ब त्यांनी सांगितला होता. मूळ mall शब्द ' ओंडका' अथवा ' ठोकळा' म्हणजे कांहीं तरी जाड प्रस्थ अशा अर्थाचा आहे. जॅ mall नव्हे तें small अशी त्यांची व्युप्तत्ति आहे.. इंग्रजी कोशकारांनी दिलेल्या इंग्रेजी शब्दांच्या व्युप्तत्या कित्येक ठिकाणीं कशा चुकीच्या आहेत, आणि त्यामुळे त्या व्युप्तत्तींतील अडचणी त्यांना मुका- ट्यानें कशा गिळून बसाव्या लागतात, है Sovereigu, Write, Calf, ( घोटा ) Thread, Appeal, Dine, Want, Give, Past, See, Nil, Supper इत्यादि शब्दावरून दाखवीत असत. Psyche या ग्रीक शब्दांत P कोठून आली, Write च्या मागें हें W चें शेंपूट काय म्हणून, आणि Sovereign मध्यें J कशाकरितां हें इंग्रेजी कोश- कारांना सांगतां येत नाहीं याचे कारण भाषाशास्त्राचे त्यांनी वसविलेले नियम सदोष आणि एककल्ली आहेत, असे त्यांच्या बोलण्यांत नेहमी येई. एकदां कशावरून कोण जाणे, रात्री २ वाजतां बागेतील नळावर उभे असतांच त्यांस एकाएकी Snvg या शब्दाची आठवण झाली. आणि लगेच त्यांनीं माडीवर येऊन सांगितलें कीं हैं एक नजर्थी 'स' काराचें उदाहरण आहे. Snug चा मूळ अर्थ Conceal असा भाव दाखविणारे आहे. त्यावरून पुढें Cosy वगैरे दुसरे अर्थ निघालें, नग्न या संस्कृत शब्दास न अर्थी 'स्' लागून Snug असा शब्द झालाः – म्हणजे नग्न नव्हे तें. Conceal शब्दही संस्कृतच असून संचैल शब्दापासून निघाला आहे. असो. या विषयावर त्यांनी कांहीं सिद्धांत बसविले होते, आणि त्यावरून हल्लींच्या भाषाशास्त्रांत मोठाले फरक करावे लागतात. द्राविडी आणि आंध्र या भाषा बोलणारे लोक हे अगदीं स्वतंत्र असून दोन्हीही वैदिक आर्यांहून वेगळे होते, आणि पुढे जरी कांहीं वैदिक आर्यांनी त्यांच्या भाषा व चालीरीती उचलून ते द्रविड व आंध्र बनून गेले, आणि त्यामुळे ३५ ओठापासून पलीकडील,