पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वैदिक भाषेची शुद्धता. ३७ वेगळे आहे. वैदिक लोकांच्या भाषेहून आणि मानववंशाहून तदितर भाषा आणि वंश हे ओळखण्याची मुख्य खूण त्या भाषेतील स्वरांत आणि धातूंच्या रचनेंत आहे. अण्णासाहेबांच्याच शब्दांत सांगावयाचें म्हणजे "It may be generally affirmed that the roots or verb-words of the Vaidic or Sanskrit language have been analytical and constitutional and couventional or accidental circumstances have taken a small part, if any, in their formation...... The Vaidic roots or Verb-words being generally con- stitutional and analytical in their formation, derivatives from such roots are generally expressive or indicatory of their analytical formation. The Vaidic language, therefore, as a whole, has ever remained pure, original and unmixed with any sound foreign to the physical frame and mind of the Vaidie human being. But as the Vaidic Rishis and practical philosophers travelled all over the world, in various directions for the propagation of the Transcendental Science, and their original civiliza- tion, the languages of the varicus non-vaidic races, came to be united and mixed with the elements of the Vaidic

  • वैदिक भाषा आजपर्यंत शुद्ध, जशीच्या तशीच आणि निर्भेळ राहिली

आहे. याचें कारण असे की तिच्यांतील ' धातु' अथवा त्यांच्यापासून निघा- लेले शब्द यांची रचनाच अशी कांहीं विशिष्ट त-हेची आहे की त्यांच्या व्युप्तत्तातच त्यांनी योतित केलेल्या सर्व भावांचा समावेश असतो. त्यांच्या रचनेंत केवळ लोकाचार अथवा अशाच प्रकारच्या इतर भानगडी फार थोड्या असतात. त्यामुळे मूळ वैदिक शरीरें व मनें यांना अपरिचित अशा शब्दो- चाराचा तिला संपर्क लागलेला नाहीं. परंतु वैदिक ऋषि आणि योगी हे ज्ञान- दानाकरितां जगभर हिंडत असतां त्यांचा व अवैदिक लोकांचा संबंध येऊन त्यांची व अवैदिक लोकांची भाषा यांचे वर (म्हणजे त्यांच्या मूळ लेखांत) सांगि- तलेल्या नियमान्वयें मिश्रण होऊन अवैदिक भाषांत नवनिपणा आला. ]