पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जानकीबाईंचा थोर अधिकार. होते, तर मला कां नाहीं मागितलेस ? " ती बाईही पण पुरीच होती. तिनें उत्तर केलें ' बरें झालें, असेंच पाहिजे | त्याखेरीज कां तो ऐकतो ? ' श्रीचे येथे मागील दारी वृंदावनाखालीं, एक वीतभर उंचीची श्रीगजा- ननाची पाषाणमूर्ती आहे. तिची हकगत मोठी विलक्षण आहे. त्यांचे वडील भाऊसाहेब हे एक दिवस नित्याप्रमाणे मेण्यांत बसून वेलस्ली पुलावरून कचेरींत जात असतां त्यांचें लक्ष सहज दूर नदीच्या पात्रांत गेलें. इतक्या दूरची बारीक गोष्ट त्यांना दिसली कशी याचेच आश्चर्य वाटतें. सरासरी अर्धा • फलांगावर एकदोन छोटे दगड खाली असून वर एकदोन मोठे दगड होते, आणि त्यांच्या बेचक्यांत एक दगड दिसत होता. ती कोणातरी देवाची मूर्ति असे त्यांस वाटून, त्यांनी लगेच मेणा थांबविला, व माणसें खालीं पाठवून ती वर आणविली. तों ती खरोखरच श्रीगजाननाची मूर्ति | तेव्हां त्यांनी मेण्यांत घालून ती मूर्ति तशीच घरी पाठविली व आपण पायींच पुढे गेले. इकडे ती मूर्ति घरीं जो पोहोंचते आहे, तो दारांत जानकीबाई उभ्याच. त्यांनी मोठ्या आनंदाने त्यांना खाली उतरविलें व म्हटलें कीं, 'आलांत आपण ? बसा, फार लांबून आलांत. थकला असाल ! ' भाऊसाहेब मूर्ति काढवीत असतांच यांना इकडे दृष्टांत झाला होता कीं, 'मी पूर्वसमुद्राहून ( चीन ) तुझेकडे येतो.' नंतर, अंगुष्ठप्रमाणाचे वर शिलामूर्ति घरांत ठेवूं नये असे शास्त्र असल्या- मुंळे, वृंदावन बांधून ती मूर्ति अंगणांत ठेवली. अशा अधिकारी जननीपासून जी ठेव श्रीअण्णासाहेबांस मिळाली, ती खरोखरच अमोल असली पाहिजे. अगदीच लहानपणीं त्यांना देवदर्शनें होत असत, व बार्गेतील झाडांकडे बोट दाखवून “ या ठिकाणी इंद्र आहे ", 'या ठिकाणी सूर्य,' असे ते म्हणत असत. काय असेल तें असो, पण बागेतील • दोनचार झाडांवर चुळकाभर पाणी टाकून त्यांना नमस्कार करणे, हा त्यांचा अखेरपर्यंत नित्यनेम होता. बेल, अश्वत्थ, उंबर वगैरेंना नमस्कार करतात, यण निंबास नमस्कार कोणच करीत नाहीं; काय कारण असेल, त्यांचे त्यांनाच ठाऊक ! जरा कांहीं झालें कीं गुडघ्यापर्यंत पाय धुणे किंवा आंघोळ करणें, वगैरे कर्मचळेपणा तर तेव्हांपासूनच होता; असो. असल्या यजमानिणीची कुळंबीणही तशीच विलक्षण. मुक्तेचें म्हातारपणापर्यंत सर्व आयुष्य यांचे घरींच गेलें. जानकीबाईवर तिचें अलोट प्रेम असे. श्री.