पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्त्रिया आणि वैदिक संस्कृति. असतेंच. शिक्षण म्हणजे काय, याचाच जेथें कांहीं निर्णय लागत नाहीं, आणि पुरुषाच्या शिक्षणासच ठिकाण नाही, तेथें स्त्रीशिक्षणाच्या नांवानें मात्र मोठा अट्टाहास चाललेला दिसून येतो. त्यामुळे धड कोणत्याच शास्त्रीय तत्त्वावर न उभारलेले संस्कार आणि कांहीं तरी आगापिछा नसलेल्या कल्पना यांचा मारा स्त्रियांच्या मेंदूवरही होऊन तो एक विचित्र प्राणिवर्ग होत चालला आहे. अशा रीतीनें स्त्री आणि पुरुष हीं समाजाची दोन्हीही अंगें प्रत्येक तऱ्हेच्या वैदिक- त्वाला दिवसोंदवस जास्त पारखी, आधुनिक संस्कृतीच्या दृष्टीने जास्त अडाणी अशीं होत आहेत. अशा स्थितीमध्ये जर वरील प्रश्नांच्या वैदिक संस्कृतीच्या दृष्टीनें कांहीं नव्या बाजू दिसल्या, तर हें माडें कोणच्या वळणावर न्यावे तें समजण्यास कांहीं लोकांना तरी उपयोग होईल. वर सांगितलेंच आहे कीं, वैदिक धर्माचा 'एकमेवाद्वितीयम्' हा आद्य सिद्धांत असून याला घरूनच त्यांनी आपली सारी शास्त्रे रचिलीं. अर्थात् त्या सर्वशास्त्रांचे धोरण 'एकमेवाद्वितीयम्' या महासिद्धांचा प्रतिसिद्धांत जो सर्व त-हेच्या विषमतेचा नाश करणें, तो जेणे करून साधेल अशीं रचिलीं. अशा स्थितीत स्त्रीपुरुषांच्या बाबतीत मात्र अप्पलपोटेपणानें त्यांनी विषमता ठेविली असे म्हणणें अज्ञानीपणाचे आहे. या लोकांच्या समतेची व्याख्याच कांहीं और असली पाहिजे. सर्वभूतांच्या ठिकाणी समत्व पाहावयाचें, म्हणजे गाईंचा चारा माणसापुढे ठेवावयाचा आणि कांडून कुटून जवळजवळ निःसत्व केलेला भात गाईस घालावयाचा, अशीच यांच्या समतेची व्याख्या दिसते. समतेची अशा प्रकारची कल्पना वैदिक धर्मांत केव्हांही नव्हती. मनुष्याचें अत्युच्च ध्येय जें ब्रह्मप्राप्ती आणि त्याला आवश्यक असलेली अतींद्रियता हीं जेणेकरून शक्य तितक्या थोड्या वेळांत आणि योग्य परिश्रमांत प्राप्त करून घेतां येतील, अशी परिस्थिति प्रत्येकापुढे ठेवणें, आणि तिचा फायदा त्या प्रत्येकास थोडा- बहुत तरी मिळेल, अशी सहजच व्यवस्था असणे, हीच त्यांची समतेची कल्पना होती. समतेच्या नावाखाली एकापेक्षा दुसरा अधिक लठ्ठ झाला म्हणून त्याचें तेवढे अंग कापून काढा, असली खुळी कल्पना त्यांनी कधींही वाढ- विली नाहीं.. अर्वाचीन विचार पद्धति आणि वैदिक लोक यांच्या समतेच्या कल्पनेत फरक पडण्याचें आणखीही कारण आहे. अर्वाचीन विचारपद्धति सर्व इंद्रियांची