पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाल्य. अण्णासाहेबांस जन्म मात्र त्यांनी दिला, परंतु त्यांचा दाईपणा सर्व मुक्तेनेंच केला. चाळपणी जर झोंपेंतून जाग आली, तर 'मुक्ता' म्हणून अण्णासाहेबांची हांक- यावयाची ! व तिनें येऊन 'काय ? आहे बरें मीं जवळ,' असे म्हणून अंगा- चरून हात फिरविला, कीं बरें वाटून पुन्हा झोप लागावयाची. ज्यावेळी जानकीबाईंनी आपला अंतकाळ जवळ आल्याचे सांगितलें, त्यावेळेस मुक्तेस फारच वाईट वाटले. आपली धनीण चालल्यावर आपणच मार्गे राहून उप- योग काय, असा विचार करून तिनें रालींच्या रात्रींच गच्चीवरून उडी टाकून जीव दिला | दुसरे दिवशीं जानकीबाईंनींही प्रयाण केले !