पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ स्त्रिया आणि वैदिक संस्कृति. कडे आणि विषयोपभोगाकडे अनिवार असते. (४) त्यांच्या मत्सरी, कलहप्रिय आणि चंचल प्रवृत्तीमुळे त्यांना स्वतंत्र राहूं देणे, केव्हांही अपायकारक आहे, म्हणून त्यांना पारतंत्र्यांतच ठेवले पाहिजे, आणि त्यांच्या बुद्धीला फांटे न फुटूं देण्याकरितां त्यांना अज्ञानांतच गाडून टाकलें पाहिजे असे सिद्धांत त्यांनीं प्रचलित केले, आणि त्यामुळे स्त्रियांना शिक्षणाचा लाभ न होतां पारतंत्र्या- मध्ये कष्टानें दिवस काढावे लागतात. हे सिद्धांत खरे आहेत किंवा खोटे आहेत, त्यांची व्याप्ति अमर्याद आहे, कीं, कांहीं रीतीनें मर्यादित आहे, आणि ते कांही विशेष कालास अनुसरून आहेत की त्रिकालाबाधित आहेत, यासंबंधी विशेष खोलांत न जातां, इतकेंच म्हणतां येईल की स्त्रियांची योग्यता अतिशय मोठी असून स्त्री म्हणजेच भावी राष्ट्राची जन्मदात्री, म्हणून जेणेकरून ती संतुष्ट राहील, अशा प्रकारें त्यांना वागवावें, अशाही अनेक समजुती शास्त्रांत सांपडतात; आणि आजच्याकाळीं देखील, सुधारणेच्या अत्युच्च स्थितींत असलेल्या राष्ट्रांतदेखील त्याच्याविषयीं या दोन्ही प्रकारच्या समजुती साधारणतः सारख्याच प्रमाणांत आहेत असें दिसून येईल. एकीकडे संस्था, सभा, वृत्तपत्रे व मासिकें, इत्यादि दर्शनी वाङ्मय त्यांची तारीफ करीत असल्याचे दिसून येतें; तर दुसरीकडे समाजाची चित्रे रेखाटणाऱ्या कादंब-या, नाटके, सिनेमा वगैरेंतून त्यांची काढलेली चित्रें “ अनंत साहसं माया " इत्यादि सिद्धांतांना सोडून तर नसतातच, परंतु उलट अधिक बळकटी आणणारी असतात. तेव्हां त्या संबंधानें शास्त्रकारांनाच वेड्यांत काढण्याची कांहीं आवश्यकता नाहीं. स्त्री आणि पुरुष हा केवळ संतति- कार्याकरितां म्हणूनच जो भेद वाटतो, तो तितका क्षुद्र नसून, अत्यंत मह- त्वाचा आहे, असें बीजतःच शरीरें विशेष तऱ्हेची निपजावी म्हणून पराकाष्ठेची काळजी घेणाऱ्या शास्त्रकारांना वाटत होते. ज्या अर्थी स्त्रीपुरुषांचीं कार्येच भिन्नभिन्न आहेत, त्या अर्थी त्या भिन्नभिन्न कारणांवरूनच, त्या दोघां- चीही तयारी, भिन्नभिन्न रीतीनेंच झाली पाहिजे हे उघड आहे. मनुष्याचें शरीर हें ज्या ध्येयाकरितां योग्य व्हावें अर्से वाटत होतें, त्या ध्येयासाठीं या शरीरांतील सर्व तऱ्हेच्या भावनांचा संग्रह जें हृदय तेंच उत्तम बनावें, हे उघड आहे. 'मातृजं चास्य हृदयं' असा सिद्धांत आहे. म्हणून मातेचें हृदयच तसल्या प्रकारच्या तत्वांनी बनलेले असावें हें उघड आहे. स्त्री आणि पुरुष ही एक