पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिक्षण म्हणजे काय ? प्रकारच्या Negative ऋण and Positive धन विद्युत् प्रवाहासारखी आहेत, हीं आपलीं भिन्नभिन्न कार्ये सांभाळून ब्रह्मप्राप्तीचें अत्युच्च ध्येय कसें संपादितां येईल, इकडे लक्ष असल्यामुळे आणि व्यक्ति ही समाजाची घटक असून सामुदायिक हिताहिताच्या दृष्टीने तिच्या हिताहिताची योग्यता ठरविली पाहिजे, आकुंचित दृष्टीस कदाचित् एखाद्या किरकोळ बाबींत त्यांचें अहित होते असे जरी दिसलें तरी त्यानें एकंदर समाजाचा जर फायदा झाला तर त्याच्याबरोबर अखेरीस यांचाही आहेच, अशी विचारपद्धति उपयोगांत आणून शास्त्रकारांनी स्त्रियां - संबंधी सर्व प्रश्न सोडविले आहेत. स्वभावतःच शिक्षण म्हणजे एखादी भाषा उत्तम बोलतां येणें, अगर एखाद्या विष- यांत जास्त कल्पना करतां येणें अशी त्यांची कल्पनाच नव्हती. शरीरांतील इच्छा, ज्ञान आणि क्रिया या तीन मुख्य शक्तींचीं समप्रमाणांत परस्परांस प्रेरक, पोषक आणि वर्धक होतील, अशा रीतीने वाढ होऊन त्या ठिकाण, गुणधर्म ठेवले गेले आहेत ते शक्य तितके उत्कृष्ट रीतीनें प्रगट व्हावे, आणि त्यांच्या मोबदल्यांत 'वशे हि यस्येंद्रियाणि ' अशा रीतीनें प्रजा प्रतिष्ठित होऊन, प्राप्त परिस्थितीचा शक्य तितका उपयोग ध्येयाच्या प्राप्तीस कुशलतेनें करून घेतां यावा, व अशा रीतीनें व्यक्तीचे आणि समाजाचें दोघां- चेही समान कल्याण व्हावे असेंच त्यांचे धोरण होतें. अशा प्रकारचें वळण मनुष्याच्या मनबुद्धींद्रियांना कळून न कळून खुषीनें अथवा सक्तीनें, सुखानें अथवा कष्टानें, कोणीकडून तरी लागावें हाच त्यांच्या शिक्षणाचा अर्थ होय. अहिल्याबाई होळकरीण अथवा भोंसल्यांची जिजाबाई यांना स्वतःला कदा- चित् एक अक्षरही लिहितां येत नसेल ! अगर आजकालच्या मानानें स्त्री- शिक्षण म्हणतां येईल असे त्यांच्या अंगी कांहीही नसेल, म्हणून त्या अशि- क्षित होत्या, असें कोणीही म्हणू शकणार नाहीं हीच दृष्टी ठेवून स्त्रियांच्या शिक्षणाची त्यांनी व्यवस्था लावली. वर सांगितल्याप्रमाणे पुरुषांकडून भिन्न असलेले आपले कार्य सांभाळून अतिशय सहज रीतीनें त्यांस उत्तमपदप्राप्ति व्हावी, म्हणून जी शिस्त त्यांना लावून देण्यांत आली, तिचें नांव पातिव्रत्यधर्म. या पातिव्रत्यधर्मानें जरी पतीचें आणि उभयपक्षांकडील अनेक कुळांचें सं... ४