पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्त्रिया आणि वैदिक संस्कृति. पूर्वी एका प्रकरणांत सर्व साघनास आधारभूत असलेले चार प्रकार सांगि- तले. त्या चारही प्रकारांचा मूळ हेतु आपण शरीर नसून आपले शरीर आहे- म्हणजे आपण कोणी तरी वेगळे असून शरीर हें साधन आहे ही जाणीव म्हणजे शरीराहून वेगळे असल्याची जाणीव, अर्थात् साक्षित्व - दशा उत्पन्न व्हावी तिच्या योगानें पुढे या शरीरारूय साधनावर पूर्ण सत्ता चालवितां येऊन स्वाधीनतेनें ते॑ घेतां यावें, चालवितां यावें, अथवा टाकतां यावें असा आहे. कोणत्याही प्रकारची साधनें घेतलीं तरी, त्याच्या योगानें अतींद्रियता प्राप्त होण्यास पातंजलोक्त योग पूर्वांगाची तयारी लागते. ह्मणून या योगांगांची तयारी जेणें करून होईल, ती गोष्ट असल्यामुळे, परमार्थाच्या अनेक मार्गा- मध्ये कर्म मार्ग आणि वैधी उपासना या उत्पन्न झाल्या. यांचे आचरण करीत असतां मनुष्य सहजासहजीं या पूर्वांगांनी संपन्न असा होतो; व सर्व साधानांचा हेतु जो कर्तृत्वाचा अहंकार नाहीसा व्हावा, व त्यामुळे लिंग देहाचा नाश होऊन मनुष्यास जिवन्मुक्ति प्राप्त व्हावी, तो सहजच साधतो. व्याधगीतेमध्ये केवळ पतिसेवा करीत असलेल्या तरुणाला अतींद्रियज्ञान प्राप्त असल्याचें आणि मांस विकणाऱ्या धर्मव्यावास केवळ स्वकर्मनिरततेनें जीवन्मुक्तीचा उपभोग असल्याचें सांगितले आहे, त्यांतील बीज हेंच आहे पातिव्रत धर्म अथवा पुढे उत्पन्न झालेली गुरुभक्ति आणि शूद्रांचें दास्य ह्रीं तीनही वस्तुतः एकच आहेत; आणि त्यांचा हेतु कोणीकडून तरी वर सांगितल्याप्रमाणे साक्षित्व उत्पन्न होऊन देह ममता ह्म० अर्थात् त्या विशिष्ट देहाच्या इंद्रियजन्य सुख - दुःखाविषय तिन्हाईतपणा उत्पन्न व्हावा, व हैं होत असतांना इच्छाशक्तीची वाढ उत्कृष्ठ रीतीनें व्हावी, हा आहे. सतीचा पति, सच्छिष्याचा गुरु, आणि शुद्राचा समाजरूप धनी हे सर्व मलखांबाप्रमाणे असून त्यांच्या योगानें कर- णाऱ्याचें शरीर जमावयाचें असतें. कसरत म्हणजे तेथें अर्थातच गोडपणा कमी असणार आणि क्लेशच अधिक असणार. अशा स्थितीत वैदिक धर्माचें ध्येय आणि मार्ग ज्यास पसंत नाहींत, ते वैदिक म्हणवीत असले तरी वस्तुतः अवैदिकच होत. अशा लोकांनी त्या परस्परांतील कष्टकारक बाजूकडेच भर देऊन कोल्हेकुई केल्यास फारसें नवल नाहीं. परंतु त्यांना जर खरोखरच वैदिक असावयाचें असेल तर एकीकडे वैदिक आहे म्हणून म्हणावयाचें आणि ५४