पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भोग का त्याग ? & लावून दिलेली पतिउपासना यांच्यामुळे सामाजिक अवनतीच्या काळांत कित्येक स्त्रियांचीं बहुमोल आयुष्य मातीत मिळाल्यासारखी होत असतील, आणि त्यांच्या अंगचे रत्नांसारखे सद्गुण उकिरड्यावर पडल्यासारखे वांया जात असतील, आणि ते पाहून दया वगैरे कोमल मनोवृत्तीनी कळकळणाऱ्या माणसास असला कसला हा धर्म' अथवा ' हेंच कां धर्माचरणाचें फळ ? " असें क्षणभर वाटणे साहजिक आहे. धर्मराजांची विपत्ति पाहून खुद्द त्याच्या भावांना व वायकोलाच हा संदेह पडला होता. तेथेही धर्मानें त्यांना 'धर्माचे आचरणही स्वतःच्या मनोरथांच्या पूर्तांकरितां करावयाचें नसून धर्माकरितांच म्हणजे त्या धर्माचें जें ध्येय असेल, त्याच्या प्राप्तीकरितां करावयाचे असते; आनुषंगानें स्वतःचे मनोरथ पुरतील, अथवा पुरणार नाहीत' अशाच अर्थाचे उत्तर दिलेले आहे. आणि मनोरथांच्या सफलतेचा आनंद उपभोगणान्यापेक्षां धर्मासारख्या कांहीं उदात्त हेतूस्तव त्या आनंदाचा त्याग करणा-याविषयींच मनुष्याच्या अंतःकरणांत जास्त पूज्यभाव आणि आदर उत्पन्न होतो. पहिल्या- पेक्षां दुसऱ्या माणसाच्या श्रेष्टत्वाची निर्विवाद जाणीव माणसाच्या अंतःकरणांत सहज असते. म्हणूनच असल्या उदात्तपणाची तहतऱ्हेची चित्रे काढून लोकां- पुढे मांडण्याचा कवी, कादंबरीकार, चित्रकार, शिल्पी, नाटककार, गवई – वगैरे सर्व ललितकलाभिज्ञांचा यत्न चाललेला असतो. ही गोष्ट मनुष्यस्वभावसुलभ असल्यामुळे पाश्चात्य विचारी लोकांनाही पटूं लागली आहे. A charactor of a highly virtuous and lofly stamp is degraded rather than exalted by an attempt to reward virtue with temporal prosperity. Such is not the re- compense which Providence has deemed worthy of suffering merit, and it is a dangerous and fatal doctrine to teach young persons, the most common readers of romance, that rectitude of conduct and principal are either uaturally &llied with or adequately rewarded by the gratification of our passion, or attainment of our wishes. In a word, if a virtuous and self denied character, is dismissed with temporal wealth, greatness,