पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ राष्ट्रीय चळवळ. विसरून या दोन गोष्टींचा नागपूरच्या काँग्रेसमध्यें संकर केल्यामुळे आज राष्ट्राची, राष्ट्रसभेची, आणि राष्ट्रनेत्याची ( महात्मा गांधी ) काय दशा झाली आहे, तें पाहिले म्हणजे या विचारसरणीचे महत्त्व लक्षांत येतें. होत्या, व व्यक्तीनें आपल्या स्वतःच्या सदसद्विवेकप्रेरणेनें, म्हणजे इतर कोणत्याही दुसऱ्या विकारास बळी न पडतां देशासंबंधी आपले कर्तव्य करण्यास तयार व्हावें व तें कर्तव्यच असल्याकारणाने त्यास कोणत्याही साहाय्याची अपेक्षा न ठेवतां, काम पडल्यास केवळ एकान्तीपणानेंच ते कर- ण्याची पराकाष्टा करावी, आणि असे करीत असतां पृथ्वीवरील वाटेल त्या मानवशक्ति त्याच्या आड आल्या. तरी त्यांच्याशी टक्कर देण्याइतके आत्मबल तिचें वाढावें, अशी राष्ट्रघटकांची व्यक्तिशः (आमच्या एका स्नेह्यांनी हे मूळतव पुढील वाक्यांत मोठ्या सुंदर रीतीनें बसविले आहे : -- An individual against the whole Empire actuated by his own sense of right and wrong.) तयारी करणे हे तिचें एक अंग होतें; आणि जोपर्यंत अशी तयारी झाली नाही तोपर्यंत राजकीयदृष्ट्या जरी कांही होणे शक्य नसले तरी केवळ हातपाय जोडून बसणे योग्य नाहीं, म्हणूनच त्याच्या जोडीस थोडाबहुत राजकीय 'प्रोपागँडा 'ही चालू ठेवावा, अशा मोठ्या सुंदर रीतीनें या चळवळीस त्यांनी सुरुवात केली. आणि जर यांतील मूळतत्त्व, व पहिले अंग यांसच ते चिकटून राहते, तर कदाचित् जरी त्यांचा एवढा बोलवाला झाला नसता, तरी राष्ट्राचे कल्याण त्यांच्या हातून आतांपेक्षां कांहींतरी पटीनें खास जास्त झाले असतें. परंतु एक तर त्यांचा जन्म बहुतेक दूरस्थळी गेल्याकारणानें केव्हाही कोणाचीही वरात काढ- ण्यास तयार असणाऱ्या आमच्या लोकांची खरी तयारी काय असते, यार्चा त्यांना कल्पना नसल्यामुळे आणि नागपूर येथील तीस हजार लोकांच्या जय- जयकारांत स्वतःच वाहून गेल्यामुळे त्यांनी मूलतत्वांचा हा सुसंघटितपणा विसरून सर्वच गोष्टींचा एकच गोंधळ केला, आणि स्वतःच्या बिनतोड युक्ति- वादाचा अभिमान, आणि अनुयायांच्या योग्यतेविषयीं भ्रम, यांच्या भरीस पडून स्वराज्य देण्याविषयीं मुदतचे सट्टे करण्याची त्यांस संवय लागली, व