पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्तृत्वहीन शहाणपणापेक्षां कर्तृत्वशील मूर्खपणा वरा ६७ अशा तऱ्हेचे मनुष्यत्व परत आणण्याचें आणि राष्ट्रीयत्वाचें संगोपन, पुनरुज्जी- वन,आणि संवर्धन करण्याचे काम सर्व तऱ्हेनें एवढ्या विस्कळलेल्या स्थितींत प्रथमतः संहृत प्रयत्नांनी केव्हांही साधत नसतें राष्ट्रीयत्व ही एक शक्ति आहे, आणि कोण- चीही शक्ति केवळ नुसत्या कल्पनांनी उत्पन्न होत नसते, कारण शरीरांत नवी अशी शक्ती कोणचीच उत्पन्न होत नसते. शरीरांत अनेक प्रवाहांनी अखंड वाहणाच्या पूर्वीच्या शक्तीलाच निरुद्ध करून इष्ट स्वरूप द्यावें लागतें. म्हणून राष्ट्रीयत्व हें नुसत्या कल्पनेत न राहतां त्याची एक शरीरस्थ शक्ती बनवा- वयाची असेल तर शरीरांतून वाहणाच्या शक्तीच्या वारेस इष्ट त्या तऱ्हेनें आळा घालून, तिचेंच रूपांतर केले पाहिजे. घरीं, दारी, रात्रीं, दिवसां, शरी- रस्थ शक्तिप्रवाह वाटेल त्या दिशेनें वाहूं देऊन काम पडले की नुसत्या कल्प- नेवरोवर राष्ट्रीयत्व स्फूर्तिसारखें शरीरांत प्रकट होईल, असे समजून वागणा- ज्या देशभक्तांनी हा गैरसमज टाळून दिला पाहिजे, आणि इष्ट त्या दिशेनें स्वतःच्या कायिक, वाचिक, मानसिक वर्तनास आळा घालून शक्तिसंवर्धक केले पाहिजे, मग त्यांत फार मोठ्या शहाणपणाच्या दृष्टीनें थोडा मूर्खपणा असला तरी चालेल असे त्यांचे मत होते. सर्वस्वी कर्तृत्वहीन बनून शहाणपणाचें पुरें माप पदरांत घेण्यापेक्षां, थोडीशी कर्तृत्वाची जोड करून कांहीं मूर्खपणा गांठीस पडला तरी चालेल, असे एकंदर त्याचे धोरण होते. आणि या रीतीनें त्यामुळे सारा चुथडा होऊन जाऊन जिकडे तिकडे कमालीची अनवस्था होऊन गेली.

  • व्यवहारांत वागतांना, अशा रीतीनें स्वतःकडे थोडासा हेकडपणा अगर

वेडगळपणा ते नेहमींच घेत असत. त्याचें एक प्रसिद्ध उदाहरण लेव्हीच्या जोड्याचें आहे. १९०८ साली सर जॉर्ज क्लार्क यांच्या लेव्हीस म्युनिसिपल कौन्सिलर म्हणून अण्णासाहेब यांस निमंत्रण होतें, व त्या साली त्यांनीही लेव्हीस जावयाचे ठरविलें होतें. परंतु इतर लोकांप्रमाणे लेव्हीस जावयाचें म्हणजे कांही विशेष तयारी करावयाची हे त्यांच्या गांवीही नसल्यामुळे खुंटी- वर ठेवलेला लेव्हीचा काळा कोट घालून तसेच ते लेव्हीस गेले. वूट पायांत घालणे त्यांस शक्य नव्हतें, परंतु एवढ्या समाजांत जोडा घालून जाणे अगर उघड्या पायांनी जाणे हेहि वेडगळपणाचेंच वाटणार होतें. परंतु ते तसेच