पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अण्णासाहेबांचे आद्य गुरु-तात्यासाहेब रायरीकर. १७ कसले संस्कार त्यांनी मिळविले, अथवा त्यांचे पूर्वसंस्कार पालटले, हे समजणें अशक्यच आहे. परंतु एवढे मात म्हणतां येईल की राष्ट्रीय दृष्टया जे अनेक प्रकारचे अनुभव घेतल्यावर, आजच्या स्थितीस हिंदुस्तान आले आहे, ते सर्व अनुभव आणि प्रयोग यांची पूर्वकल्पना करून आणि थोडक्यांत थोडक्यांत त्यांचा अनुभव घेऊनच त्यांनी आपले याविषयींचे सिद्धांत ठरविले होते. अण्णासाहेब मॅट्रिकची परीक्षा १८६४ मध्ये पास झाले. यापूर्वीच त्यांचा संबंध पुण्यांतील एक घरंदाज सरदार रा. तात्यासाहेब रायरीकर यांच्याशी पडला होता. श्री. तात्यासाहेब रायरीकर हे त्यांचे आद्य गुरु असावे असे वाटतें. श्रीमंत दादासाहेबांस भर देऊन ज्या कांही महापुरुषांनी इंग्रजांचें पाऊल आपल्या घरांत घेतलें, त्यांत तात्यासाहेबांचे पूर्वज इतिहासप्रसिद्ध चिंतो विठ्ठल हे होते. ही गोष्ट तात्यांच्या मनास अत्यंत लागून राहिली होती. आपल्या पूर्वजांनी स्वदेशाचा सत्यानास होण्यास मदत केली, याची त्यांस अत्यंत लाज वाटत असे; आणि स्वतः शक्य तेवढा प्रयत्न करून ही काळोखी धुवून काढावी म्हणून ते अहर्निश तळमळत असत. असे सांगतात कीं, पुण्यांतील त्या वेळचे अधिकारी सिद्ध पुरुष नरहरस्वामी यांच्या कृपेनें तात्यासाहेबांनी तपश्चर्येस प्रारंभ केला. त्या तपश्चर्येचा हेतु इष्टदेवतेपासून अस्त्रविद्या संपादन करण्याचा होता. अत्रें संपादन केल्यावर उत्तर हिंदुस्तानांत जावें, व तेथील लोकांच्या मदतीनें इंग्रजांशी दोन हात करावे, अशी महत्त्वाकांक्षा या धीरोदात्त पुरुषानें बाळगिली होती. अनुष्ठानाच्या समाप्तीनंतर त्यांस दर्शन होऊन प्रासादिक शस्त्र मिळाले, परंतु त्याच्या उपयोगाची वेळ टळून गेली, असे त्यांच्या उपास्य देवतेनेंच सांगितले. त्यावरून निराश न होतां तात्यासाहेब हे उत्तरेस जावयास निघाले. पुणे सोडल्यावर त्यांस लागलीच बातमी समजली कीं उत्तर हिंदुस्तानांतील बंडाचा मोड झाला असून पुढे जाण्यांत कांहीही अर्थ नाही. तरीपण ते नेटानें तसेच पुढे जात असतां, इंग्रजांनी त्यांस पंढरपूर येथें पकडून पुन्हा परत आणलें. तात्यासाहेबांचा इतिहास पुढें थोडासा स्वतंत्रच द्यावयाचा असल्यामुळे हा विषय सोडून आपण मुद्याकडे वळूं. हा इतिहास द्यावयाचे कारण देशाचें स्वातंत्र्य परत मिळविण्याकरतां देवी उपायावर विश्वास असणारे आणि दैवी प्रयत्नांची २