पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ राष्ट्रीय चळवळ. 6 ( भाऊ साठे जवळच होते, त्यांनी वैतागून अण्णासाहेबांस म्हटले की, आप- णच असा सल्ला देतां, अशा भित्रेपणाने काय व्हावयाचें आहे ? बेधडक आंत जायला पाहिजे, काय करतें पोलीस ? पण तुम्हींच असा सल्ला देतां तेव्हां आम्ही नेहमी असेच राहणार, असाच योग दिसतो. त्यावर थोड्याशा झट- क्यानें अण्णासाहेबांनी उत्तर दिलें, हो, हो, जोपर्यंत तुमच्यासारखे देश- भक्त म्हणवत आहेत, तोपर्यंत असेंच राहणार. बेजबाबदारपणानें सल्ला द्याव- यास कांही वाटतें ? माझ्या गुरूनें मला असलें धैर्य शिकविलें नाहीं. एकदां मान पुढे केली, की तुटली तरी परत मागे घ्यावयाची नाहीं, हेंच मी शिकलों आहे. दुसऱ्यास परभारें सल्ला देऊन त्याची मौज पाहणारे तुम्हीं, काय बोंब मारणार, दिसतच आहे. अशाच रीतीनें त्याला (टिळकांना ) एकट्याला पुढे पाडून जेथें तेथें तोंडघशी पाडतांना कांही वाटले नाहीं; पिकेटिंगची दोमदोम् करावयास सारे तयार, परंतु शिक्षा झाल्या म्हणजे भरा वळवंतराव आपल्या खिशांतून ! एवढे वाटत होतें, तर एक दहा हजार लोक गोळा करून ' हे आम्ही जातो वाज्यांत, काय करावयाचें तें करा, ' असे म्हणून पोलीसच्या उरावर तेथें रावता नाही पाडला कोणी. हा गरीब वुवा, बरोबर परिवार, त्याचें हें काम नाहीं, अशा स्थितीत परभारें त्याच्यावर प्रयोग करायला तयार. पुढें थोडासा पेंचांत आला म्हणजे पैसे कांहीं तूं काढून देशील का ? याव- रून बरेंच बोलणें निघून त्यांनी रानडे, शं. पां. पंडित, वगैरेंच्या कित्येक हास्यकारक गोष्टीहीं सांगितल्या. याप्रमाणे पुढान्यांच्या वेजबाबदारपणाचा व आंगचुकारपणाचा त्यांना संताप येत असे, व अशा तऱ्हेचें वर्तन व अशा तऱ्हेची देशसेवा न करतांना, समर्थांच्या उक्तीप्रमाणे ' सामर्थ्य आहे चळ. वळीचें । जो जो करील त्याचें, 1 परंतु आर्धी भगवंताचें अधिष्ठान पाहिजे ॥ हैं वचन लक्षांत ठेवून वागा म्हणून ते सांगत असत. आणि गेल्या वर्षांतील अनेक अवस्थांतून निघाल्यावर हल्ली जी स्थिति राष्ट्र व त्यांतील चळवळी यांना आलेली आहे, ती पाहिली असतां, त्यांची मतें बरोबर नव्हतीं असे कोण म्हणेल ? असो. , येथे एक गोष्ट उघड सांगावीशी वाटते. देशाच्या भवितव्यतेविषयीं अण्णासाहेबा- च्या तोंडून निघालेल्या भविष्यांसंबंधी आम्ही मार्गे स्पष्टच लिहिले आहे. त्या- वरून भविष्यवाद अशा रीतीनें त्यांनी कधी कोणास कांहीं सांगितलेच नाहीं, e