पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ पुण्यांतील शिक्षण. कमाल करणारे लोक त्यावेळी होते, हे लक्षांत यावें. अण्णासाहेबांच्या सांगण्या- प्रमाणे त्यांचा स्वभाव पहिल्यापासूनच देवधर्म आणि शास्त्र यांच्याविषयीं निवळ पूज्यबुद्धी नव्हे, तर अढळ श्रद्धा असलेला असा होता. तरी पण देवी उपायांच्या जोडीस सर्व प्रकारचे मानवी प्रयत्न झालेच पाहिजेत, असे वाटत असल्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्याची दिशा, सर्व प्रकारचे अनुभव प्रत्यक्ष घेऊन ठरवावी, असा निश्चय केला. पूर्वी सांगितल्याप्रमाणें अतीशय तेजस्विता, स्वदेश आणि स्वधर्म यांच्याबद्दल प्रखर जळजळीत स्वाभिमान या गुणांस श्री. तात्यासाहेबांसारख्या बाणेदार तपोमूर्तीची जोड मिळाल्यामुळे, राजकारणाचा जो अभ्यास सहज घडला, इंग्रजी राजनीतीचें जें सहज परीक्षण झालें, आणि एकंदरींत राजनीतिशास्त्राचीं जीं तत्त्वे त्यांच्या अंतःकरणांत विंबलीं, त्यामुळे एक प्रकारें तयार होऊनच ते कॉलेजांत शिरले. अशा प्रकारच्या पूर्व तयारी- मुळे नवीन विचारांच्या अथवा नवीन संस्कृतीच्या झगझगाटानें दिपून न जातां स्वतःजवळील संस्काराच्या तागडींत त्यांना तोलण्याइतकी क्षमता त्यांच्या बुद्धींत राहिली. त्यामुळेच आज पन्नास पाऊणशे वर्षांच्या प्रयोगानंतर इंग्रेजी शिक्षण, इंग्रेजी नीति, पाश्चात्य संस्कृति, यांच्या फोलपणाची जी आज खात्री पटली आहे, ती त्या वेळींच त्यांस पटली होती. परंतु ती तशी स्वतःस पटली तरी, इतरांस सप्रयोग पटवून देतां येईल, तरच तिचा उपयोग होईल, हे त्यांनी ओळखिले होतें. केवळ स्वाभिमानानें आपलें तेंच उत्तम, असे म्हणणारा वर्ग देशांत केव्हांही असतोच; आणि त्याची योग्यताही कांहीं कमी नसते. अशाच लोकांपैकीं अण्णासाहेब हे जास्त योग्यतेच पुरुष होते, अशी सामान्यतः समजूत आहे. परंतु त्यांनी आपल्या आयुष्यांत ज्या अनेक प्रकारच्या चळवळी केल्या, त्यांच्या विविधतेकडे आणि व्यापकतेकडे पाहतां असें म्हणावें लागतें कीं, अंतःप्रेरणेने तर त्यांनी हें ओळखले होतेंच, परंतु तें अनुभवासह स्वजनांच्या गळीं उतरून घ्यावें, हाच त्यांचा त्या वेळचा आयुष्यांतील हेतु होता; आणि ह्मणूनच त्यावेळी देखील फोल वाटणारें इंग्रेजी शिक्षण घ्यावयास ते कॉलेजांत गेले. कॉलेजांत जाऊन मिळवितां येण्याजोग्या सर्व पदव्या मिळवाव्या, व विलायतेस जाऊन I. C. S; I M. S वगैरेसारख्या पदव्या मिळवून मग ही संस्कृति किती कुचकामाची आहे, असें अधिकारवाणीनें लोकांस सांगावें, ही त्या वेळची आपली महत्त्वाकांक्षा अस