पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अण्णासाहेबांचा विद्यार्जनांतील हेतु. १९ ल्याचें ते प्रसंगोपात्त बोलून दाखवीत. अशा प्रकारचें विद्यार्जन करीत असतां ज्या ज्या कांही प्रयत्नांचे साहाय्य देशाच्या उद्धारास होईल, ते ते सर्व जातीनिशीं सुरूं करावे असा त्यांचा इरादा होता. आणि हीच त्यांच्या सर्वां- गीणतेची साक्ष आहे. " अमुक एक गोष्ट उपयोगी पडेल म्हणतात ना, मग ती सुरू करा, तेथें पसंतीनापसंतीचा प्रश्न नाहीं, " असा त्यांचा धारा होता. म्हणून एकाद्या सामान्य व्रतापासून अगर देवतेला नवस करण्यापासून तो वासुदेव बळवंतांच्या खटपटींस मान देण्यापर्यंत आणि विधवांच्या पुन- विवाहापासून तो पतित-परावर्तनापर्यंत किंवा सभा, संस्था, वृत्तपत्रे, व्याख्यानें, प्रदर्शनें, कारखाने आणि परराष्ट्रगमनच तर काय परराष्ट्रीय चळ- वळीपर्यंतच्या सर्व व्यापांची कल्पना आधींच उभारून, यथाक्रम त्यांनी त्या सर्वांसच हात घातला. असे करावयास कोणाही मनुष्यास, जीं चार चतुर्बळें ( शरीर, द्रव्य, बुद्धि, मनुष्य ) लागतात, त्यांर्चाही अण्णासाहेबांजवळ कोणत्याही तऱ्हेची कमतरता नव्हती. भाऊसाहेबांच्या श्रीमंतीमुळे द्रव्य- बळाची त्यांस कमतरता नव्हती; शरीरवळही त्यांनी उत्तमच कमाविलें होतें, त्यांचा पिंड मुळचाच सुदृढ आणि भव्य होता. त्यांच्या हूड स्वभा वाला अनुरूप असे सर्व तऱ्हेचे खेळ व व्यायाम यांच्या योगानें त्यांनीं तो अधिकच बळवान् केला होता. या काळांतील आपल्या हूडपणाच्या कित्येक गोष्टी ते सांगत असत. त्यांतील एकदोन सांगण्याजोगत्या आहेत. बापूसाहेब मेहेंदळे हे त्यावेळचे प्रसिद्ध वैद्य होते. कांहीं कारणावरून त्यांची चेष्टा करावी असे वाटून अण्णासाहेब त्यांचेकडे गेले, व आपली प्रकृति नीट नाहीं असे सांगून औषध मागूं लागले. त्यावर बापूसाहेबांनी विचारले " तुला काय होत आहे ? ” तेव्हां ते म्हणाले की, जठराग्नी प्रदर्दाप्त होऊन भूक वाढावी अर्से कांहीं औषध द्या. बापूंनी आहाराची चौकशी केली असतां ' आपण फक्त चौदा पोळ्या व अदपाव तूप खातों,' म्हणून त्यांनी सांगितलें ! तेव्हां हा चेष्टा करतो असे वाटून आपल्या जवळील एक अतीशय जलाल भस्म देऊन बापूंनी तें जवून, थोड्या प्रमाणांत सात दिवस घेण्यास सांगितलें. घरी गेल्यावर अण्णा- साहेबांनी विचार केला की सात दिवस गुंज गुंज कोण घेत बसतो ? असा विचार करून एकदमच त्यांनी तें सर्व गट्ट करून टाकलें, व सात दिवसांनंतर 'बापूंच्याकडे जाऊन 'भूक वाढली नाही,' म्हणून तक्रार करूं लागले ! त्यावर