पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ इतिहास. साहेबाच्या कारस्थानासंबंधी कांहीं प्रत्यक्ष लेखी पुरावा होता, असे ऐकण्यांत आहे. पुस्तकांतील फरकासंबंधी एवढेच आठवतें कीं, ' Propositions made to Bajirao and accepted by him ' असे शब्द मूळ १८३५ किंवा अशाच कांहीं सालांत छापलेल्या प्रतीत होते. बाजीरावसाहेब यांच्या मृत्यूनंतर लागलीच जी प्रत बाहेर पडली, त्या प्रतींत, ' and ac- cepted him' एवढेच शब्द नेमके गाळून टाकण्यांत आले. या शब्दांचे महत्त्व काय होतें, हें सांगणे आमच्या आटोक्याबाहेर आहे. आणि त्यांनी थोडक्यांत सांगितलेली विचारसरणीही लक्षांत नाहीं. परंतु राजनीतिनिपुण अशा कायदेपंडिताच्या तें कदाचित् लक्षांत येईल. याशिवाय आणखी कांहीं फरक त्या पुस्तकांत आहेत की काय हे माहीत नाहीं, मूळ तह अशा स्वरूपाचा असून वीस खंडांचा होता व ती एक प्रकारची खंडचिठ्ठी होती, असें, त्यावेळी वाड्यांत जात असलेल्या भाऊसाहेबांच्याकडून त्यांच्या कानावर आलें. मुंबईस असतांना मूळ प्रत त्यांनी वाचली होती; परंतु तेव्हां या गोष्टीकडे त्यांचे लक्ष गेलें नाहीं. परंतु पुढे सांगलीकर, जंजिरेकर, डफळा- पूरकर वगैरे संस्थानिकांची अपिले लिहितांना पुस्तक पुन्हा वाचण्यांत आलें, आणि त्यामुळे दोन आवृत्तींतला फरक लक्षांत आला. रा. व. जोशांचे कागद सुदैवानें पुढे मागें सांपडल्यास इतिहासाला मोठीच मदत होईल. तोंपर्यंत जुन्या लोकांतील आख्यायिका म्हणून हा भाग लक्ष्यांत ठेवावयास तरी हरकत नाहीं.