पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तात्यासाहेब व यशवंतराव महाराज. ९९ " १ तपाचरण यथापूर्व चालूच होतें. पुढे त्यांचें शरीर थकल्यावर अंतकाळ जवळ आला असे समजून संन्यास घेण्याची त्यांनी इच्छा दर्शविली. तेव्हां महा- राजांनी त्यांना संन्यास दिला. असे सांगतात की, त्या वेळेस तात्यासाहेबांचीं स्थिति अगदीं आसन्न झाली होती. सर्व विधि झाल्यावर महाराजांनी चमच्यांत दूध घेऊन त्यांच्या तांडाशीं नेलें, व 'आ करा, ' म्हणून सांगितले. तेव्हां मनास मोठे क्लेश होऊन तात्यासाहेब म्हणाले कीं, ' हैं आपण काय देतां ? माझे व्रत ठाऊक नाहीं कां ? ' त्यावर महाराजांनी सांगितलें कीं, मला माहीत आहे, परंतु तात्यासाहेब आतां तुम्ही नारायणरूप झालां, राग-द्वेष टाकून द्या. ' तेव्हां डोळे पाण्याने भरून येऊन मोठ्या आवेशानें त्यांनी सांगि- तलें कीं, 'महाराज, अर्से असेल तर हा तुमचा संन्यास मला नको. तो आपला परत घ्या कसा ? माझें व्रत पूर्ण झालेच पाहिजे. ’ असें बोलून त्यांनीं दूध घेण्याचे साफ नाकारलें. तेव्हां मोठा संतोष होऊन महाराजांनीही सांगि- तलें कीं, 'तात्यासाहेब, तुमची खरोखरच धन्य आहे. तुमचें व्रत पूर्ण झालें. तुमच्या हातूनच हें कार्य पुढें होईल. आतां हा प्रसाद घ्या. ' तात्यासाहेब यांची महाराजांचे ठिकाणी विलक्षण निष्ठा होती. त्यांच्या तोंडून निघालेलें हैं आश्वासन ऐकून तात्यासाहेब यांस अतिशय संतोष झाला, व त्यांनी मोठ्या आनंदानें 'नारायण' म्हणून ते दूध प्राशन केले. महाराजांनाही मोठा आनंद होऊन जमलेल्या मंडळांत तात्यासाहेबांची त्यांनी अतिशय प्रशंसा केली. या वेळेस गाडीत बसून महाराजांस कोठें बाहेर जावयाचें होतें. परंतु तो बेत रहित करून त्यांनी बैठक टाकण्यास सांगितलें, व 'यशवंतराव भेटीस येत आहेत ' म्हणून सांगितलें. असें थोड़ें बोलणें चालणें होत आहे तोंच यश- वंतराव ऊर्फ देवमामलेदार तेथे येऊन पोहोंचले. नमस्कारचमत्कार झाल्यावर महाराजांनी तात्यासाहेबांचे गुणवर्णन करून सांगितले की 'यशवंतराव ! तात्या- सारखा मनुष्य होणार नाहीं. गृहस्थाश्रमी मंडळींत तात्यासाहेब यांचा नंबर पहिला. यावज्जन्म तोंडांतून असत्यवाणी म्हणून निघालीच नाहीं, ' वगैरे पुष्कळ प्रशंसा केली. अण्णासाहेब त्यावेळी जवळच होते, ते सांगत कीं हें सर्व ऐकून यशवंतरावांनाही फार वाईट वाटलें, व डोळ्यांत अश्रु आणून त्यांनीं प्रार्थना केली की 'महाराज, तात्यासाहेबांचें तर सार्थक झालें, पण आतां या शरीराचे काय करणार? एक तर आतां पुरें तडीस लावा, नाहीं तर ●