पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०० परिशिष्ट. आपल्या हातानें कोठें तरी आडांत लोटून द्या.' त्यावर महाराजांचा व त्यांचा कांहीं एकांत होऊन देवमामलेदार अतिशय समाधानानें परत गेले. देवमामले- दार यांस श्रीनरसिंहउपासना पूर्वी केव्हां तरी महाराजांनींच दिलेली होती, ही गोष्ट कोणास फारशी ठाऊक नाहीं. वरील प्रसंग झाल्यानंतर लवकरच केव्हां तरी, किंवा कदाचित् वरील प्रसंगीच महाराजांनी त्यांना परोपकार करण्याविषयी आज्ञा केली, असे महा- राजांस आलेल्या त्यांच्या एका पत्रावरून दिसतें. ही आज्ञा त्यांनी जन्मभर कशा कसोशीनें पाळली, व पुढे त्यांचा अधिकार वाहून मोठा लौकिकही कसा झाला, वगैरे गोष्टी प्रसिद्धच आहेत. असो, यानंतर तिसरे दिवशीं तात्यासाहे- बांनी देह ठेविला. नरहरस्वामींच्या समाधीला लागूनच ओंकारेश्वरासमोरील पडवीच्या मार्गे तात्यासाहेब व त्यांचे चिरंजीव यांच्या समाधी आहेत. स्वदे- शाच्या स्वातंत्र्याकरितां अखंड तळमळणाऱ्या या महात्म्याची आठवण आज जरी पुण्यास नसली, तरी त्यांची तपश्चर्या, त्या ठिकाणीं सदैव जागृत असली पाहिजे; व जेव्हां केव्हां ऊर्जितकाल यावयाचा असेल, तेव्हां देशोद्धारक वीरांना अनुकूल अशा गुणसंपत्तीची प्रेरणा व पुरवठा तेथून होईल, यांत संशय नाहीं. परमार्थी जीवापेक्षांही देशवीराचें महत्त्व अधिक मानणाऱ्या आधुनिक लोकांनी तर तात्यासाहेब यांच्या समाधीचे दर्शन नित्य नेमानें घेतले पाहिजे, तात्यासाहेब यांचा बांधा बळकट परंतु ठेंगू होता. वर्णानें गौर व तेजस्वी असून स्वभाव फार तापट होता. रायरीकरांच्या वाड्यांत एका लहानशा ग्रूपमध्ये त्यांचा एक फोटो पाहण्यांत आला. त्यावरून त्यांच्या चेहऱ्याची ठेवण आणि गंडस्थळे वगैरे अवयवांवरून त्यांची बुद्धिमत्ता व धोरण यांचाही बोध होतो. मनुष्यस्वभावाची पारख व शालिहोत्र म्हणजे अश्वविद्या यांच्यांत त्यांचा हातखंडा असे. घोड्यांच्या सर्व प्रकारच्या जाति, त्यांचे गुणधर्म, इष्टा- निष्ट, त्यांना वागविण्याच्या व शिकविण्याच्या युक्तथा वगैरे सर्व गोष्टींची त्यांना फार बारीक माहिती होती. घोड्यांच्या रोगांसंबंधाचें व चिकित्सेचेंही ज्ञान चांगलें होतें. सर्कसमिध्यें घोड्यांच्याकडून जीं कांहीं कौशल्याची कामे करून घेतली जातात, तसलीं करणाऱ्या लोकांस, पूर्वी, चाबुकस्वार म्हणत असत. तात्यासाहेब हे त्या सर्व कलेत मोठे निष्णात होते. त्यांचा बांधा ठेंगणा होता,