पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीनरसिंहसरस्वती महाराज. श्रीअण्णासाहेब यांच्या चरित्रार्थी अत्यंत महत्त्वाचा संबंध असलेली दुसरी एक व्यक्ति महाराज श्रीनरसिंहसरस्वतीस्वामी हे होत. यांचें थोडेसें वर्णन पूर्वी एका प्रकरणांत आलेच आहे. त्यावरून थोडीशी माहिती लक्षांत येईल. तात्यासाहेब यांच्या निमित्ताने अण्णासाहेबांची व त्यांची गांठ पडली, व एकदां जो ऋणानुबंध जडला तो उत्तरोत्तर दृढ होऊन पुढे पुढे तर अण्णासाहेब व महाराज श्रीनरसिंहसरस्वती हे एकरूपच होऊन गेले. तात्यासाहेबांच्यामुळे परिचय होण्यापूर्वी महाराजांची व अण्णासाहेबांची गांठ पडली होती, असेही ऐकण्यांत आहे. जटामंडित अशा वेषानें भिक्षेच्या निमित्तानें वाड्यांत येऊन महाराज चौकांत वाकावर बसले होते. व अण्णासाहेबांची आणि त्यांची दृष्टादृष्ट होऊन कांहीं थोडेसें विशेष भाषण होऊन एकमेकाची खूण एकमेकास पटली, अशीही हकीकत ऐकण्यांत आली. तें कांहीही असले तरी तात्यासाहेबानीं त्यांची व महाराजांची ओळख करून दिली, असेच त्यांच्या बोलण्यांत येत असे, व महाराजही तात्यासाहेबांची मंडळी म्हणूनच त्यांना ओळखत. पहिल्यापासूनच महाराजांचा त्यांच्यावर अतिशय लोभ असून 'दादा' म्हणून नेहमी त्यांस हांक मारीत; अथवा भाषण वगैरे कर- तांना ' राजा' अशा शब्दांनी संबोधीत. ' ही मंडळी म्हणजे आमचें लष्करी खातें आहे, ' • इकडचा डोंगर तिकडे उचलून ठेवण्याचे काम यांच्याकडे आहे, ' 'हा कृतयुगाचा कंटक आहे,' अशा तऱ्हेच्या शब्दांनी ते नेहमी त्यांचें कौतुक करीत. अण्णासाहेब यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांचा आणि महाराजांचा जो संबंध आला, त्याला सुरुवात एक प्रकारच्या कलहांतच झाली. यांची बुद्धि- मत्ता आणि कर्तृत्व दांडगें असल्यामुळे, आणि त्याला जोडूनच व्यासंग व अवलोकन हींही प्रचंडच असल्यामुळे उगीच कोणी कांहीं एकाद्या विशेष गोष्टीने त्यांना भारून टाकावें हैं शक्य नव्हते. महाराजांचा बहुरंगीपणा प्रसि- द्धच आहे. त्यामुळे अनेक लोक त्यांना आपापल्यापरीनें वेगवेगळ्या रीतीनें ओळ- खत. कोणाच्या दृष्टीनें ते एक अलौकिक विद्वान् होते; कोणी त्यांना अतिशय रंगेल म्हणत, कोणाच्या दृष्टीनें उत्तम भगवद्भक्त, उत्तम योगी, दांडगे मंत्रशास्त्री,