पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीअण्णासाहेब यांचा जिवंतभाव. १०५ वगैरे प्राप्त पुरुषाच्या हातून सहज घडणारे सर्व चमत्कार यांच्या हातूनही 'झाले. परंतु या चमत्कारांच्या मुळेच महाराजांवर अण्णासाहेब यांची श्रद्धा बसली असें नाहीं. पूर्वी सांगितलेला लिंबकाच्या मुंजीचा चमत्कार व असेच दुसरे कित्येक चमत्कार पाहिल्यावर देखील, तात्यासाहेब कर्वे यांच्याकडून श्रीगजाननोपासना त्यांनी घेतली, हे लक्षांत ठेवण्याजोगे आहे. कशाही रीतीनें · कां होईना महाराज हे विद्वान्, चमत्कार करणारे, कोणी सिद्ध पुरुषच नसून, सर्व भूतांच्या ठिकाणी प्रत्यगात्मा साक्षी, जीव, चैतन्य, प्राण इत्यादि प्रकारानें प्रगट होणारे सकल भूतभव्यभवत् गोचरागोचर वस्तुमालरूपवर परमेश्वरच होत, अशी त्यांची खात्री झाली आणि तेव्हांपासून महाराज हा त्यांच्या भाषेत वरील सर्व भावनांचा पर्याय शब्द बनला. केवळ अण्णासाहेब मद्रासहून आल्यावर महाराज लौकरच शांत झाले, तरी पण अण्णा- · साहेबाच्या दृष्टीने ते जसेच्या तसे अखंड आहेतच. फक्त दुसन्यास त्यांचें सहज दर्शन घेतां येत नाहीं, इतकेंच. त्यामुळे महाराजांची पूजा करणें, नैवेद्य दाखविणें, वगैरे कामे त्यांच्या दृष्टीने संकल्पमय नसून प्रत्यक्षच होती. प्रत्येक वेळेस महाराजांस नमस्कार ·करणें, प्रत्येक वस्तु महाराजांच्या पायास लावणें, वगैरेंची दुसन्यास मोठी मौज वाटे, परंतु जिवंतभाव कसा असतो, याचें तें मूर्तिमंत उदाहरण होतें. किंबहुना महाराजांची तसवीर अशी त्यांना कधी वाटतच नसे. एकदां बोलतांना सहज 'महाराजांची ती तसबीर आहे,' असें एक गृहस्थांच्या बोलण्यांत आलें. त्याबरोवर मोठ्या आवेशानें ते एकदम म्हणाले 'मूर्खा तसबीर कोठली ? प्रत्यक्ष महाराज आहेत ! ' महाराज असतांना त्यांचा तसेंच महाराजांच्या तसबिरीचा फोटो काढवितांना असेंच झालें. फोटो काढवावा म्हणून त्यांच्या बड्या बड्या शिष्टमंडळींची खटपट चालली होती. काही केल्या महाराज रुकार देईनात. तेव्हां एकदां त्यांना फसवून त्यांचा फोटो काढवावा, असा बूट निघाला. व श्रीमंत बाबासाहेब सांगलीकर यानीं फिरावयाच्या निमित्तानें महाराजांस त्यावेळचा पुण्यांतील सुप्रसिद्ध फोटोग्राफर नौरोजी यांचेकडे नेलें. महाराजांस स्टुडिओंत नेऊन बसवितांच सारा प्रकार त्यांच्या लक्षांत आला. परंतु ते नेहमीप्रमाणेच हास्यमुद्रेनें स्वस्थ बसले. इकडे फोटोग्राफरनें 0