पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ धुळ्याचे वोवासाहेब. तो त्यांनी अण्णासाहेब यांजकडे सोपविला. असे सांगतात कीं मागाहून लोक आपले देव्हारे करतील ते होऊं नयेत म्हणून देह ठेवण्याकरितां ते मुद्दाम आळंदीस आले. परंतु श्रीमहाराजांनी अगदी निक्षून आज्ञा केल्या- मुळे आळंदीस सुरूं केलेला कार्यक्रम तसाच सोडून त्यांना परत जावें लागले. पुढे रीतीप्रमाणें व्यवस्था होऊन सांप्रदायाच्या आळंदी, धुळे आणि पुणे, या तीन पीठांपैकी धुळे येथे एक पीठ स्थापन झाले. बुवासाहेबांनी पुष्कळ लोकांस मार्गास लाविलें, परंतु त्यांतल्यात्यांत नुकत्याच निवर्तलेल्या ती. गं. भा. गयाताई यांचे विस्मरण चालूं पिढीस तरी लौकर होणार नाहीं. त्यांचौ ती तेजःपुंज गौरमूर्ति, तापट स्वभाव, श्रद्धा, सेवापरायणता आणि दूध व निंवाचा पाला सेवन करून सतत २५ वर्षे केलेली कडक तपश्चर्या यांच्यामुळे, सायंकाळ झाली असतांही मेवांवरून परावृत्त झाल्यामुळे जास्त रेंगाळत राहिलेल्या संधिप्रभेचाच भास होत होता. श्रीपाद रानडे म्हणून दुसराही एक यांचा अधिकारी शिष्य होऊन गेला असे सांगतात. त्याच्याविषयीं असे ऐकण्यांत आहे को महाराजांचें दर्शन झाल्यावर त्याने 'बुवासाहेबांस दृष्टी द्या' म्हणून प्रार्थना केली. व 'नुसतें तसे करणे शक्य नसले तर माझी दृष्टी जाऊं द्या, पण त्यांना दृष्टी या म्हणून सांगितलें. महाराजांनींही तसे करण्याचें कवूल केलें, परंतु अशी अट घातली की आधी बुवासाहेबांस विचारून ये. परंतु वुवासाहेबानी या गोष्टीचा निषेध केल्यावरून त्याला आपला हट्ट सोडून द्यावा लागला. 1