पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ श्रीकंचिस्वामी. करितां विद्यार्थी ठेवलेले असत. स्वतः अय्या कोठेही असले तरी त्यांचें नांव घेणें सुरू असे. व वेदशाळेतील विद्यार्थी तुळशी तोडून श्रीवरदराजास नित्य नियमानें लाखोली वाहात. ही वेदशाळाही अर्थात त्यांनाच चालवावी लागे. तेवढ्याकरितां भाविक लोकांकडून मासिक, वार्षिक, व नैमित्तिक अशा देणग्या बांधलेल्या असत. ठरलेल्या दिवशीं रामचंद्रअय्यांची स्वारी त्या गृहस्थांच्या दाराशी नेमकी हजर व्हावयाची किंबहुना लक्षनामस्मरण व कानगी गोळा करणें येवढे दोनच काय ते हेतु त्यांच्या आयुष्याला होते. अशा रितीनें कोणा- च्याही लक्षांत आल्याखेरीज ह्या अधिकारी पुरुषाचें सर्व आयुष्य गेलें. यांच्या अधिकाराच्या व स्थितप्रज्ञतेच्या कांही गोष्टी अण्णासाहेब सांगत. एकदां त्यांनी श्रीवरदराजाकरितां केवडा तोडावा म्हणून झाडास हात घातला तोंच एका भयंकर कृष्ण सर्पानें त्यांस दंश केला. त्यावरोवर लहान पोराने एकादी चेष्टा केली असती त्याचें कौतुक करावें तसें 'लज्जा कुडका' ( हा रांडलेका ! ) असे थोडेंस हसून त्यांनी म्हटलें, व मंदिरांत जाऊन श्रीवरदराजांचे गंध हातास लाविले. सर्पदंशापासून त्यांस कांहीं बाधा झाल्याचें थोड़ें देखील दिसले नाहीं. असेंच एकदां श्रीवरदराजांची कानगी गोळा करून येत असतां वात त्यांची व कांहीं चोरांची गाठ पडली. साक्षात् मृत्युचीही भीति ज्यांच्या मनास कधीं शिवावयाची नाहीं त्यांच्या मनास मोठें भय वाटू लागलें कीं, आतां श्रीवरद- राजांचें वित्त त्यांच्या पायाशीं सुरक्षित कसे पोहोंचेल. तेव्हां त्यांनी त्याच ठिकाणी मुक्काम केला, व `द्रव्याचें गांठोडें उशास घेऊन झाडाखाली आंग टाकले त्यांच्या बरोबरच्या मंडळीस तेंच पाहिजे होतें. पुढे काय झालें हें कांहीं ठाऊक नाहीं. परंतु ते एवढेच सांगत कीं, जागे होऊन पाहातात तो आपण एकटेच असून उशाचें गांठोडें लांबवले गेले आहे असे त्यांना आढळून आलें. तेव्हां 'असो वरदराजाची मर्जी' असे म्हणून ते कंचीस परत आले व थोडेशा जड अंतःकरणानेंच श्रीवरदराजांचे दर्शनास गेले. ते सांगत- 'जाऊन पाहातों तों 'स्वामी' हांसत होता व त्याच्या पायाशीं द्रव्याचें गांठोडें ठेविलेलें होतें.' पुढे आपणांस चिंता पडलेली पाहून वरदराजांनी स्वतःच चोरावर मोर करून तें गांठोडें कंचीस आणले असे समजून आल्यावर त्यांना मोठा हर्ष झाला. तसेंच एकदां आंधिया रात्री नदीच्या कांठाने चालले असतां पाण्याशी कोणी तरी खेळत आहे असा त्यांस भास झाला. व कोण आहे म्हणून पहावें