पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ पुण्यांतील शिक्षण. एकत्र केलें, आणि पाणी ओढावयाचा जाड दोरखंड देऊन 'हा. झटक्यासरशी कोण तोडतो?' म्हणून विचारलें. इतर कांहीं विद्यार्थ्यांनी झटापटी केल्यावर अण्णासाहेबांनी एकाच झटक्यासरशी त्याचे दोन तुकडे करून पुढे ठेवले ! त्याबरोबर अतिशय प्रेमानें व कौतुकानें 'डब्यांतील लाडू तूंच उडविलेस की नाही, सांग, ' म्हणून नानांनी यांचा हात धरला ! अशा तऱ्हेच्या गमती त्यावेळी अनेक चालत. या वेळेपासूनच पुढें I. C. S ला उपयोगी पडाव्या म्हणून वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास यांनी सुरू केला होता. I. C. S. करितां सरकारनें ठेव- लेली स्कॉलर्शिप वाटून घेऊन इंग्लंडला जावयाचें, म्हणून हे व याचे एक मुसलमान स्नेही यांचा करार ठरला होता. ह्या मुसलमान स्नेह्यावर यांचें, व त्याचें व त्याच्या कुटुंबाचें यांचेवर, फार प्रेम असे. त्याच्या दिलदारपणाची व त्याच्या आईच्या सौजन्याची आणि खानदानीची आठवण अण्णासाहेब अखेरपर्यंत काढीत असत. अरबी भाषा, मुसलमानी शास्त्र व कुराण आणि मुसलमानी रीतिरिवाज यांची माहिती अण्णासाहेबांनी या मुसलमानी गृहस्थापासूनच मिळ- विली असावी, अर्से दिसतें. ती स्कॉलर्शिप पुढे एका ख्रिश्चन मनुष्यास मिळाली, आणि तेवढ्यापुरता तरी यांचा विचार रहित करावा लागला. तरीही स्वतःच्या खर्चानेंच इंग्लंडला जावें, असे पुढे कित्येक वर्षे यांच्या डोक्यांत घोळत होतें. कॉलेजमध्ये असतांनाच कायद्याचा थोडाबहुत अभ्यास करण्यास व लिहि- ण्यास यांना सुरुवात केली होती. वाईचे शेख मिरा यांच्या प्रकरणांतील खट- ल्यास तेव्हांपासूनच सुरुवात झाली होती, व त्यासंबंधी कांही काम १८६८ त आपण लिहिले होतें, म्हणून त्यांनी मला एकदां सांगितले होतें. कांही दिवस अष्टावधानीपणाचा अभ्यास आपण त्यावेळी केला असल्याचें ते सांगत असत. इंग्रजी काव्याविषयीं यांना बरीच गोडी असावी, असे त्यांनी मजजवळ वेळो- वेळीं काढलेल्या उद्गारावरून वाटतें. त्यांतल्या त्यांत शेक्सपिअरच्या नाटकाची प्रशंसा ते बरीच करीत असत. वर्डस्वर्थ तर प्रत्यक्ष त्या कवीच्या नातवाजवळच ते शिकले होते. एकंदरीत त्या वेळचे इंग्रजी प्रोफेसर व शिक्षक व शाळाखात्यां- तील इतर अधिकारी यांच्याविषयी अण्णासाहेबांच्या मनांत मोठा आदर असे. त्यांच्या मायाळूपणाची व विद्यादानाच्या कळकळीची आणि व्यासंगाची ते प्रांजळपणानें स्तुति करीत असत. केरूनानांचे ज्योतिः शास्त्राचे गुरु प्रो. आलिंबार