पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कांहीं इतर मंडळी. अण्णासाहेब यांच्याजवळ असलेल्या लोकांत विष्णु भैरव काळे या गृह- स्थांवर त्यांचा विशेष लोभ होता. रात्रींचें देवदर्शन विष्णुपंतास बरोबर घेत ल्याखेरीज अण्णासाहेब यांनी कधीही केले नाहीं. हे गृहस्थ कोठल्याशा ऑफि- समध्यें नौकर होते, व नौकरीचा वेळ खेरीज करून इतर सर्व वेळ ते अण्णा- साहेब यांच्या सहवासांत घालवीत. यांच्या चातुर्याची, हजरजवाबीपणाची, प्रसंगावधानाची, आणि मुत्सद्दीपणाची अण्णासाहेब एवढी तारीफ करीत कीं अनुकूल काल असता तर विष्णुपंत नाना फडणीसाच्या योग्यतेस चढले असते, ' असें ते नेहमी म्हणत. यांच्या प्रमाणेच गणपतराव आठवले, पंजाब, इंद्रस्वरूप बारीक मास्तर वामनराव दातार, व माधवराव गोडबोले अशी लहानमोठी मंडळी क्रमा- क्रमानें त्यांच्या सहवासाला आली, आणि त्या सर्वांवर त्यांचा लोभ असून प्रत्येकांशी त्यांचें कांहीं विशेष सहकार्य ठरलेलें असे. गणपतराव आठवले होते तोपर्यंत त्यांना घेतल्याखेरीज अण्णासाहेब कर्धी आळंदीस गेले नाहीत. त्यांच्या मागून पुरुषोत्तमपंत हे होते. त्यांना अण्णासाहेब नेहमीं पंजाब असे म्हणत. इंद्रस्वरूप हे उत्तरहिंदुस्तानी वैद्य होते. पुष्कळ वर्षेपर्यंत अण्णासाहेब यांचे- कडील आण-ने, बाजारहाट तेच करीत असत. वामन हा तर त्यांच्या वहि- णीचा नातु. याचा निर्मळ व लहान पोरासारखा सरळ स्वभाव, आणि अण्णासा- हेव यांचे वरील एकनिष्ठा ही खरोखरच अप्रतिम होती. ' हें एक महारा- जांचें बालस्वरूप होतें, केवळ संतांचा कोंव, ' असे त्याच्याविषयीं अण्णासा.. हेब म्हणत. माधवराव गोडबोले हे धुळे येथील प्रसिद्ध वकील रा० गोविंदराव गोडबोले यांचे चिरंजीव. बी. ए. पास झाल्यावर यांनी एल्. एलू. बी. चाही अभ्यास केला व पुढें खुद्द वडलांच्या उपदेशानें संसारत्याग करून ते अण्णासाहेब यांचेकडे आले. अण्णासाहेब यांच्या आज्ञेप्रमाणें आज सुमारें पंधरा वर्षे हे आळंदीसच राहत असतात. आळंदी येथील महाराजांच्या संस्था- नचे दुसरे अधिपती श्रीभक्त शंकरवुवा यांच्या मागून यांनाच एकमतानें गादी- वर वसविण्यांत आले. त्याप्रमाणे श्रीमहाराजांची सेवा सर्व प्रकारें करून संस्थानचा लौकिक वहार हे किती दक्षतेनें करतात ते सर्व लोकांस ठाउकच आहे. "