पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ श्रीमंत बाळासाहेव नातु. आणा. म्हणजे तुम्ही आम्ही भोजन करूं. एरवीं तुमचे एथलें अन्न स्पर्श करण्यासही योग्य नाही. याप्रमाणे निर्भीड व चोख उत्तर ऐकतांच बाळासाहेब यांना वाईट तर वाटलेंच परंतु अण्णासाहेब यांचें म्हणणे बरोबर आहे असा विचार करून त्यांनी त्याचा विषाद करणे टाकून दिलें. इतकेच नव्हे तर तर त्यांच्या मनांतील आदर उलटा द्विगुणित झाला. असो. अण्णासाहेब यांच्या निर्याणाच्या पूर्वी सुमारें दोन वर्षे मधुमेहाच्या विकाराने बाळासाहेब पुण्यासच वारले. 0