पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साधु गुलाबराव माधानकर. गुलाबराव माधानकर यांचें नांव माहीत नाहीं असा इसम वऱ्हाडांत तरी विरळाच. शूद्र जाती, जवळ जवळ जन्मांधत्व, लहान वय इत्यादि गोष्टींचा विचार केला असतां त्यांच्या विद्वत्तेनें मनुष्य थोडासा थक्क होऊन जातो. यांचें चरित्र प्रसिद्ध झालेले आहे. तेव्हां त्याविषयीं अधिक कांहों लिहावयाचें नाही. त्यांचा आणि अण्णासाहेबांचा संबंध कसा आला हे मागें सांगितलेंच आहे. वादविवादाची खुमखुम जिरली नाही म्हणून इतकेच तर काय पण अण्णासाहेब यांनी स्वतःची नुसती विचारपूसही केली नाही म्हणून त्यांचा .अण्णासाहेबांवर रोष होता. व त्यांच्या लिहिण्यांत क्वचित् कोठें तो उमटून पडतो. परंतु पुढें अण्णासाहेबांवरील हा त्यांचा राग नाहीसा झाला व उलट त्यांच्यावर त्यांची भक्ती जडली तो प्रसंग असा. गुलाबराव महाराजांस बद्धकोष्ठतेचा विकार होता. हळूहळू त्याचें पर्यवसान क्षयांत झालें. काय कारण असेल कोण जाणे पण आपणांस क्षयाची भावना झाली असे त्यांना पक्के वाटतांच त्यांनी अण्णासाहेब यांचेंच औषध घ्यावयाचें ठरवून ते पुण्यास आले, व अण्णासाहेबांच्या देखरेखीखालीं उपचार सुरू झाला. या निमित्ताने दोघांचा सहवास घडून गुलावरावांचें मनांत अण्णासाहेबांविषयीं आदर उत्पन्न झाला व तो एकसारखा वाढतच गेला. आणि पुढे पुढे तर अण्णासाहेब यांच्या भेटीकरतां त्यांचा जीव तरसूं लागला. पांच मिनिटें तरी रोज तुम्ही मला भेटा म्हणजे झाले. त्यानें मला जें बरें वाटतें तें सांगतां येत नाहीं अर्से ते म्हणत. त्याप्रमाणे अण्णासाहेब हे रोज भेटावयास जात. ★तेवढ्याकरितां गुलावरावांची माणसें व्हिक्टोरिया घेऊन दाराशीं तीन तीन तास · वाट पहात बसत. अशाच एका प्रसंगी आतां आयुष्य किती उरले आहे तें •सांगा म्हणजे मी माझी तयारी करतों असें गुलाबराव यांनी विचारलें. त्यावर अण्णासाहेब यांनी चटदिशी अभ्यासी माणसांनी आपला बाहेर जाणारा प्रत्येक श्वास हा शेवटचाच आहे असे समजून चालावें असें उत्तर दिले. अशाच एका प्रसंगी दारावरून कांहीं लोक गाई विकावयास नेत असतां एक गाय विकत घ्यावयाची इच्छा होऊन गुलाबराव यांनी ती विकत घेतली. तेव्हां तिच्याकरतां पांच रुपये अण्णासाहेब यांनीही दिले. पुढ ती गाय कोठें 0