पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. अण्णासाहेबांची त्या वेळची राहणी. २३ म्हणून कोणी फ्रेंच होते, त्याची तर अशी गोष्ट सांगत की रोज सकाळी नाना व इतर दहाबारा विद्यार्थी उठून स्नान करून सूर्योदयास संध्या वगैरे केल्या- खेरीज त्यांस शिकवावयाचें नाहीं असा त्याचा नेम असे, व तेवढ्याकरितां या गोष्टी त्यांनी केल्या आहेत की नाहीं, हैं तो जातीनिशीं स्वत पहात असे ! लोक खरे विद्याव्यासंगी होते, व विद्यार्जनाची व दानाची त्यांना इतकी खरी कळकळ होती कीं, राष्ट्रीय अथवा धार्मिक भेद देखील त्यांच्या उत्कंठेस शिवत नसत, व त्यामुळेच ते इतके निष्कपट आणि निःपक्षपाती बनले होते. डॉ. ही याच्या विद्वत्तेची तर ते फारच तारीफ करीत. कांहीं तरी असल्या विचारांत डोकें गढून गेल्यामुळे त्याची स्थिति एकाद्या भ्रमिष्ट माणसाप्रमाणे बनली होती. मेण्यांत बसून थोडा वेळ झाला की, लगेच आपण कोठें जात आहों ही गोष्ट तो विसरून जाई, व वारंवार त्याला हालवून लोकांना 'आतां उतरा,' असे त्याला सांगावें लागत असे! या वेळची अण्णासाहेबांची राहणी मोठी श्रीमंती थाटाची व झोकदार असे. सर्व प्रकारचा हौशीपणा पुरवून घ्यावयाचा, परंतु गुलाम तर कशाचेंच होऊन राहावयाचें नाही, असा त्यांचा तेव्हांपासूनच बाणा होता. “ धर्मास व नीतीस विरुद्ध असलेल्या गोष्टी सोडून बाकी सर्व तऱ्हेच्या हौशी व व्यसनें मी परा- काष्ठेचीं केलीं,” असे ते सांगत. भव्य मूर्ति, बांधेसूद अवयव, गौर वर्ण, तेजस्विता, रुबाबदारपणा, यांच्या जोडीस मोतिया रंगाचें उंची पागोटें, छडीदार अंगरखा, पायांत लालभडक जोडा आणि तोंडांत लालभडक विडा, यांची भर पडून कानांतील डुलणारी भिकबाळी आणि हातांतील मोतियांचे गजरे यांच्या झोकांत, पेलेदार छाती पुढे काढून तालीमबाजी ऐटीनें या मनोहर मूर्तीस चालतांना पाहून सर्वच विस्मित होत असत, यांत नवल तें काय ? त्यांच्या त्या मोतियांच्या गजऱ्यांची आठवण काढणारे लोक अजूनही तुरळक कोठें कोठें आहेत. अशा रीतीनें व्यक्तीविषयक व राष्ट्रीय सर्व सिद्धांताचा सांठा कमावून, त्याचा उप- योग स्वजनांस देतां यावा म्हणून १८६८ साली ते मुंबईस आले; व त्यांच्या आयुष्याची यापुढील १२ वर्षे सर्व तऱ्हेचे उपद्व्याप करण्यांत आणि स्वार्थ- त्यागाचे अनेक धडे शिकण्यांत गेली.