पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ साधु गुलावराव माधानकर. ठेवावी असा प्रश्न पडला कारण ती दुभती नसून लंगडी होती. अखेरीस ती अण्णासाहेबांनी आपलेच घरीं ठेऊन घेतली. ती लंगडी व आजारी असल्या- मुळे तिला नेहमीं बांधून ठेवावी लागे. पुढे ती अतिशय आजारी पडली तेव्हां तिची एखाद्या माणसाप्रमाणें शुश्रूषा अण्णासाहेब यांनी करविली. बिन पाण्याचें उत्कृष्ट दुधावर तिला ठेवून सर्वप्रकारचें उपचार करून पाहिले व अखेरीस तिनें देह ठेवल्यावर तिला आळंदी येथें रवाना करून जांबूळ वेटांत समाध देवविली. व स्वतः तिच्या करतां स्नान करून मग त्यांनी अन्नग्रहण केलें. या गुलाबराव महाराजांच्या गुणांचें व धर्मशास्त्रांवरील श्रद्धेचें अण्णासाहेव फार कौतुक करीत. आणि त्यांच्या दुखण्यांत रा. हरीभाऊ केवले नाना कवि मंडण वगैरे त्यांच्या सभोवतालच्या मंडळींनी त्यांची जी शुश्रूषा केली तिचीही प्रशंसा करीत.