पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० वकीली. थोडी बहुत प्राप्तीही पण झाली. अशा लोकांशी वागतांना, आपण धंदेवाईक वकील आहों, अशा तऱ्हेनें ते वागत नसत. श्री. दादासाहेब खापर्डे हे त्यांच्या- विषयीं नेहमीं म्हणतात – “He was not & lawyer but a jurist." असलेल्या कायद्याचा कुशलतेनें उपयोग करून, मनाजोगतें काम करून घेण्या- पेक्षां कायदेशास्त्राची उत्पत्ति व मांडणी यांच्या निरनिराळ्या उपपत्ति बसवून, व नवीन नवीन तऱ्हेच्या मांडणी प्रकल्पून स्वतःचा पक्ष यशस्वी करून घेण्यां- तच त्यांचे अप्रतिम नैपुण्य होतें, किंवा दोनही तऱ्हेनें त्यांचें नैपुण्य सार- खेच होते, हे कळण्यास साधन नाहीं. कारण त्यांनी कोर्टात विशेष कामच केले नाहीं. अण्णासाहेब यांच्या वकिलीसंबंध थोडी फार अधिक माहिती असली तर त्यांचे चिरंजीवांनाच असण्याचा संभव म्हणून त्याविषयी थोडक्यांत लिहून देण्याविषयी आम्ही त्यांनाच विनंति केली; व त्यांनीही मोठ्या आनंदाने हें काम पत्करून एक छोटासा लेख लिहून दिला. यावद्दल जरी आम्हांस आनंद होत आहे तरी देखील त्यांनी स्वतःच्या वडिलांच्या केलेल्या या सेवेबद्दल आभार मानण्याचा अतिप्रसंग कसा करावा हेही समजत नाहीं. रा. बाबासाहेब यांचा लेख जसाचा तसाच खालीं दिला आहे. श्रीअण्णासाहेब हे आर्ट्सप्रमाणे कायद्याचेहि पदवीधर होते आणि त्यांनी हायकोर्टात वकीला करण्याची सनदहि काढली होती तेव्हां त्यांनी वकीली कशी काय चालविली हें जाणण्याची इच्छा सहजच होते. परंतु ती तृप्त होणें शक्य नाहीं. सन १८७९ सालचे सुमारास त्यांना सनद मिळाली त्याप्रमाणें त्यांनीं पांच सहा महिने मुंबईस कामहि केलें, व हायकोर्ट वकिलाला त्यावेळी शोभेल असा इतमामहि ठेवला, परंतु भवितव्यता निराळीच होती. सन १८८० सालीं सर सालरजंग यांच्या वऱ्हाडासंबंधींच्या योजनेचें कार्य त्यांनी आंगावर घेतले व त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांत स्वतःचा पैसा व बुद्धिमत्ता हीं दोन्ही खर्च करून ते जवळ जवळ शिजवून आणले. त्याचवेळी मद्रासनजीक कारव्हटनगर येथील जहागिरी संबंधाचेंहि तसेंच एक काम त्यांचेकडे आले व दोन्हीं कामे एकाच वेळी पार पाडण् निश्चयाने त्यांनी सन १८८० सालीं मद्रासेस प्रयाण केले. तेथे त्यांचा मुक्काम सरासरी ३१ वर्षे होता. त्यांचा स्वभाव मुळापासूनच जरी धर्मनिष्ठ, देशनिष्ट, स्वाभिमानी आणि स्वार्थ-