पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांचा लेखी वकीलीवरील कटाक्ष. परङ्मुख होता तरी अत्यंत कडकडीत वैराग्य, निष्कांचनत्व आणि निरपेक्ष परोपकार हा मार्ग जो त्यांनी पुढे कायमचा स्वीकारला त्याला आरंभ मद्रासकडे असतांनाच झाला. अण्णासाहेब मद्रासहून सन १८८४ साली पुण्यास परत आले ते व्यावहारिक दृष्टया बदललेले असेच आले. त्यांच्या स्वार्थत्यागी आणि निश्चयी स्वभावाची ज्यांना माहिती होती त्यांना है परिवर्तन आश्चर्यकारक वाटले नाही. परंतु वर्षानुवर्ष किंबहुना त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत ते कायम टिकेल अशी मात्र कोणाचीहि कल्पना नसेल व अण्णासाहेबांनीहि आपल्या निश्चयाची परिस्फुटता कोणाजवळ केली नाही. त्यामुळे धंदेवाईका- प्रमाणे कायद्याचें काम ते मधून मधून घेत व तें अगदी मन लावून करीत. तथापि पुण्यास परत आल्यानंतर प्रत्यक्ष वकीलपत घेऊन कोर्टात कधींही काम केलें नाहीं. परंतु वकीलीचातुर्याचा जो अर्थ लोक समजतात- म्हणजे कायद्याची वारीक छाननी करून त्यावरून आपल्याला अनुकूल अशा तऱ्हेनें आपली बाजू सजविणे, आणि प्रतिपक्षाचे मुद्दे साधार खोडून काढणें- त्या • अर्थाप्रमाणे पाहिले असता त्यांनी आपली वकिली उत्कृष्ट लढविली असे दिसून येईल. सातारचे महाजनी, पुण्यातील त्यांचे आप्त गणेश दिनकर जोशी; मित्र बाळशास्त्री लागवणकर, त्यांचे दुसरे मित्र भाऊ साठे, तळवड्याचे भालेकर, कोठिंब्याचे इनामदार इत्यादिकांचे मोकदमे व त्याचप्रमाणे वाईकर शेख मिरे, विष्णु- पंत साठे, पांडुरंगराव बारी इत्यादि मित्रांचे लहानमोठे अर्जया सर्व प्रकरणांत त्यांनी आपल्या बाजूचें म्हणणें लेखी मांडले आहे. आपले म्हणणें लेखी मांडण्या- विषयीं त्यांचा कटाक्ष फार असे. वकीलाने भाषण करावें व जज्जानें त्यांतून त्याला हवा तो मजकूर टांचण म्हणून उतरून घ्यावा हा प्रकार त्यांस पसंत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपले म्हणणें कोर्टाचें कामांतसुद्धां लेखीच दिले. त्यामुळे ते किती मुद्देसूद रीतीनें मांडलें व त्यांत कायद्याची कशी छाननी केली आहे हे समजून येतें. विशेषतः साठे,भालेकर,वाई कर यांचें प्रकरणांत तर त्यांच्या मुद्दयाप्रमाणेच केवळ नव्हे तर विचारसरणीप्रमाणे कोर्टाचे निकाल झाले. साठे यांचे प्रकरणांत, गहाणखता- वरून झालेल्या हुकूमनाम्यांत ऋणकोस गहाण सोडविण्याची सवड देतात असा हुकूमनामा पुनः कायम (absolute ) होणें अवश्य आहे की काय, असा मुद्दा निघाला. या मुद्यावर मुंबई हायकोर्टाचे निवाडेहि बऱ्याच अंशीं विरुद्धच होते. परंतु अण्णासाहेब यांच्या लेखी प्रतिपादनाचा नामदार जेन्किन्स यांचे