पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ वकीली. उहापोह होऊन पूर्वीचा निवाडा विरुद्ध असतांहि जेन्किन्स साहेबांनी हुकूम- नामा पुनः absolute केला पाहिजे असा ठराव केला. अशा तऱ्हेनें त्यांचे पुढे सर्वच लेख कायद्याचे विवरणाने भरलेले आहेत. त्यांत चालू कायद्याचा जसा कीस काढला आहे, त्याचप्रमाणे कायदेशास्त्राचाही परामर्ष घेतला आहे. परंतु या सर्व बाबतींत जो पक्ष अन्यायाचा आहे असे त्यांस वाटलें, त्या बाजूनें त्यांनी आपली लेखणी धंद्याच्या दृष्टीनेंहि उचलली नाहीं. हें त्यांचें धोरण निश्चित होतें. त्या कारणानें खासगी व्यक्तीपेक्षां सार्वजनिक प्रश्नावरील त्यांच्या लेखांत कायदेपांडित्य ओतप्रोत भरलेले आढळते सन १८९५ सालपासून अखेरपर्यंत ते सार्वजनिक सभेचे प्रमुख होते. त्यामुळे ज्यूरीप्रकरण, जमीन महसुलाचा कायदा, जातीजातींतील तंटे, नातूबंधूंची अटक, अधिकार विभा- गणी इत्यादि सर्व प्रश्नांवर अण्णासाहेबांनीं लेख लिहिले आहेत. त्यांत काय- द्याचें विवेचन, कायद्याचें इष्टानिष्टत्व, कायद्याच्या तत्त्वांचे विचार उत्कृष्ट रीतीनें मांडले आहेत. अडचणीची गोष्ट इतकीच की हे सर्व लेख कोर्टाकरितां, अगर सरकारकरितां लिहिले असल्यामुळे इंग्रजीत लिहिले आहेत. नातुवन्धूंच्या अर्जांत मुंबई इलाख्यांतील १८२७च्या कायद्याप्रमाणे अटक करण्याचा जो अधि कार सरकारास आहे तो तात्पुरता आहे. महिनोंगणती अटकेत ठेवण्याचा अधिकार सरकारला नाहीं हा मुद्दा तोंपर्यंत कोणास सुचला नव्हता तो उपस्थित करून सिद्ध करून दाखविला आहे. त्याचप्रमाणें अटक केलेल्या इसमाची खाजगी मिळकत जप्त करता येत नाहीं हाहि एक मुद्दा होता. वरील अर्जांप्रमाणे नातू- बन्धूंची जप्त केलेली मिळकत सरकारला लवकरच खुली करावा लागली. आपल्या विचारसरणीत प्रतिपक्षाला कायद्याच्या दृष्टीनें, अगर कायदेशास्त्राच्या दृष्टीनें दोष काढतां येऊं नये अशी पूर्ण खबरदारी अण्णासाहेब यांच्या प्रत्येक लेखांत आहे त्यामुळे कोणताही लेख आटपशीर नाही. तथापि लेखनशैली अत्यंत स्पष्ट अशी आहे आणि एकेक शब्द तोलून लिहिला आहे. हयगय किंवा चालढकल याचें नांवच नको. लेख त्यांनी तोंडानें सांगावा व लेखकानें लिहावा असा त्यांचा परिपाठ असे. त्यांच्या अनेक धार्मिक व्यवसायामुळे लिहिण्याचें काम बहुधा रात्री ११ च्या पुढे सुरू होई त्यामुळे लेखक टेकीस येऊन कंटाळून जाई. आपले म्हणणे मांडावयाचें तें किती मुदतीत मांडले पाहिजे किंवा किती थोडक्या शब्दांत, किंवा किती आर्जवी भाषेत मांडले पाहिजे