पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वकीली. श्रीअण्णासाहेब यांचे हातचा महत्वाचा असा शेवटचा लेख म्हणजे पब्लिक सव्हिस कमिशनने काढलेल्या प्रश्नांची उत्तरें आणि डफळापूरच्या वृद्ध राणी- साहेब यांच्या जहागिरसिंबंधाचें प्रकरण हे होत. त्यापैकी डफळापूरचें काम त्यांनी सन १९०९ चे अखेरीस हाती घेतलें. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी कीं, तें त्यांचे हातून पुरे झाले नाही. राणीसाहेबांचे कारभारी ज्यांनी तें अण्णासाहे- वांकडे सोपविले त्यांची अण्णासाहेब यांचे ठिकाणी अत्यंत निष्ठा होती. अण्णा- साहेब यांनी त्या कामीं पराकाष्ठेची मेहनत घेतली. त्याकरितां मराठी सरकार, इंग्रज सरकार व जहागीरदार यांचे सबंध, तहनामे व कायदा यांच्या दृष्टीने कसे काय असावे व कसे काय होते असा त्यांत मुद्दा होता. जहागीर- दार हे इंग्रजाचे प्रजाजन नव्हेतच परंतु मांडलिकहि नव्हेत असा अण्णासाहे- बांचा निर्णय होता. ह्याचें थोडकेंसें विवेचन त्यांनी १८९३ सालीं डेक्कन हेरल्ड या दैनिकांत एक पत्र लिहून केले. त्यावेळी मुंबई कायदे कोन्सिलांत जहागीरदारांनी आपला प्रतिनिधि पाठवूं नये असा त्यांचा अभिप्राय होता. तोच मुद्दा डफळापूर प्रकरणांत अगदी निर्विवाद सिद्ध करावयाचा अशा धोर- णानें त्यांनी लिहिण्यास सुरवात केली. मजकूर छापूनहि तयार झाला. इत- क्यांत याहिपेक्षां दुसरा कोटिक्रम त्यांस सुचल्यानें त्यांनी पूर्वी छापलेला सर्व मजकूर रद्द केला व पुनः नवीन मजकूर लिहिण्यास सुरवात केली. या वेळीं त्यांचें वय ६५ वर्षांचें होतें. पूर्वीचा रद्द केलेला मजकूरहि उत्तम होता. तेव्हां तेंच प्रकरण तुम्हीं सरकारकडे पाठवा वेळ घालवूं नका असा स्पष्ट इशारा कारभाऱ्यांस त्यांच्या हितचिंतकांनी निक्षून केला. परंतु अण्णासाहेबांच्या हातूनच काम उत्कृष्ट व्हावें अशाच सद्बुद्धीनें त्यांनी तो सल्ला ऐकला नाहीं. अखेर थोडक्याच दिवसांनी म्हणजे १९१३ च्या अक्टोबरांत पूर्वोक्त कार- भारी पुणे येथेंच वारले. व तें काम त्यांचे जागीं दुसरा कारभारी आल्यामुळे अपूर्णच राहिले. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी कीं, प्राचीन राज्यपद्धतीवर अण्णासाहेबांचे अत्यंत निश्चित आणि सुंदर असे विचार याच अपुऱ्या लेखांत ग्रथित झालेले आहेत. यानंतर त्यांनी कोणताहि लेख लिहिला नाहीं. पुढे सुमारें चार वर्षे ते मनाच्या अत्यंत उदासीन किंवा निर्विकार स्थितीत राहिले आणि " नाभिनन्देत मरणं नाभिनन्देत जीवितम् । कालमेव प्रतीक्षेत निर्देशं भृतको यथा 11 हें मनु महाराजांचें वचन त्यांनी प्रत्यक्ष प्रत्ययास आणून दिलें. " १३४