पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनुष्य या नात्यानेंच किंमत उतरली आहे. समजत नाही, परंपरा राखण्याचें महत्त्व ज्यांना वाटत नाहीं, अथवा उपयुक्त परंपरा उत्पन्न करण्याकरितां जे धडपडत नाहींत, ते लोक व्यक्तिशः कसेही असले, तरी राष्ट्रदृष्ट्या त्यांची मुळींच किंमत नसते; अगर असली तरी ती लवकरच हल्लीच्या जर्मन मार्कच्या शेजारी येऊन बसते. पारतंत्र्यांतील राष्ट्र या नात्याने का होईना, हिंदुस्थानालाच दुनियेच्या बाजारांत किंमत नाहीं. जग त्याला एक भूप्रदेश समजतें, फारच झाले तर एक मृतप्राय राष्ट्र म्हणून त्याची संभावना करण्यांत येते. महाराष्ट्रालाही अर्थातच हें लागू आहे. थोडें याचेही पुढे जाऊन जास्त स्पष्टपणें असें म्हणतां येईल की, मुळीं मनुष्य- प्राणी या नात्यानेंच सृष्टीच्या बाजारांत हिंदु लोकांची किंमत उतरलेली आहे; आणि हेच कदाचित् या सर्व अपयशाचें कारण असेल ! ( , रानड्यांचा प्रार्थनासमाज, ह्यूमसाहेबांची राष्ट्रसभा, विष्णुवोवांचा वेदोक्त- मानवधर्म, सार्वजनिक काकांची स्वदेशी, अंताजीपंतांचा पैसाफंड, विजापूर- करांचे राष्ट्रीय शिक्षण, विवेकानंदांचे रामकृष्ण मिशन, रामतीर्थांच्या 'अहं ब्रह्माच्या डरकण्या, वारोंद्राची अराजकता, टिळकांची ' जितक्या पुरतें तितकें' म्हणणारी वास्तविक असहकारिता, अथवा गांधींचा कल्पनासुलभ, मनोरम, असहकारयोग, कांहींही झाले तरी ही सारीं मनुष्य प्राण्यांच्या करितां आहेत. जेथें मनुष्य या नात्यानेच देहधान्यांची किंमत उतरली आहे, तेथे कोणाचही चळवळ झाली म्हणून काय झालें ? तिला यश कोठून येणार ! कानाला गोड वाटतें, वुद्धीला समजतें, अंतःकरणाला पटतें, घटकाभर वाईट वाटतें, - पण काय करावें ? जागृत झालेला भाव रक्तावरोवर नसानसांतून वाह- तच नाहीं, रोमरोमाला हलवूच शकत नाहीं, शरीराच्या कणाकणाला व्यापून टाकण्यापूर्वीच 'पंक्चर, करून निघून जातो ! अशा स्थितीत अलौकिक पुढारी असले, तरी त्यांनी निष्काम कर्मयोगानें समाधान मानावें, नाहीं तर काय करावें ? कारणे कांहीही असोत, अशी स्थिति झाली आहे खरी. आणि स्थिति सुधारल्याखेरीज, तिच्यांत पालट होणें केव्हांही अशक्यच आहे. आध माणूस या नात्यानें आपली किंमत वाढवा, मग काय करावें तें सहज समजेल व साजेल. पालट व्हावा म्हणूनच राष्ट्रीय शिक्षण, व्याख्यानमाला, वाजाय- प्रसार वगैरे अनेक दिशांनी प्रयत्न चालू आहेत, आणि मुख्यतः- " मानवी आयुष्य म्हणजे नानाप्रकारच्या जबाबदा-यांचें एक भले मोठे