पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खरोखर नास्तिक व खरोखर आस्तिक. १४५ अनेक व सर्वच पार्थिव कोटींतील असल्यानें, हीनसामर्थ्य असतात. त्यामुळे त्यांच्याशीं वंचकता करण्यासही सवड राहते, व अधःपाताचेंही भय नसतें. त्यामुळे त्यांच्याजवळ आयुष्य अशी स्वतंत्र वस्तूच नसते. कार्यानुबंधी जबाव- दाया अनेक असल्या तरी आयुष्याची अशी कांही त्यांच्याजवळ स्वतंत्र जवावदारीच नसते. त्यांना ते कोणीं दिलेलेच नसते, तेव्हां त्याचा त्यांना जबाब तरी कोण विचारणार ? एक प्रकारें हे लोक फार चांगले. इंद्रियसुखापलीकडे त्यांचेपुढे कोणचेंही ध्येय खरोखरच नसते. आपले ध्येय आणि जीवन आप ल्याच कर्तृत्वावर अवलंबून आहे, याची जाणीव त्यांना पक्की असल्यामुळे, सर्व प्रका- ● रच्या मानवी शक्ती उपयोगांत आणण्याची संवय लागून त्यांची वाढ होते, आणि त्याला कोणी पुसणारें नसल्यानें, सर्व तऱ्हेच्या तीव्र कोमल मनोवृत्ती अरण्यांतील वेलीप्रमाणे यथेच्छ फोफावून 'पोटाxxचा ' कां होईना पण तो एक ठसठशीत जोमदार माणूस तरी बनतो. मनांत आणल्यास भोगवासना तृप्त करण्यापुरता जोमदारपणानें उपभोग तरी त्याला घेतां येतो. आस्तिकाची गोष्ट तशी नाहीं. त्याच्या सर्व कृत्यांवर पहारा ठेवणारा कोणी सर्वज्ञ, सर्वशक्तिमान्, सर्वव्यापी असा देव आहे, असे त्याला वाटत असल्यामुळे त्याला कर्मवंचकता करण्यास सवडच नसते. त्याचें जीवन म्हणजे रात्रंदिवस अखंड काम करणारी गिरणी | अखंड त्यांतून माल बाहेर पडतच असतो, आणि तो शक्य तितका उत्कृष्ट आणि पहिल्या प्रतीचा अप्रतीम काढण्याचा त्याचा अट्टहास सुरू असतो ! त्याखेरीज त्याला गत्यंतरच नसते. आयुष्यरूपी कर्मक्षेत्र, आणि हें शरीररूपी साधन त्याला देवाने दिलेले असतें. याचा एक दिवस तो आपल्याला जबाब विचारील, हा धाक त्याला चित्तांत वागवावा लागतो. त्यामुळे त्याच्यावर वस्तुतः एकच जवाबदारी असते, मग त्या जबाबदारीचीं व्यावहारिक स्वरूपें कितीही व कशीही असोत. त्यामुळे आस्तिक माणूस म्हणजे भाड्याच्या घोड्याप्रमाणे शरीरास वागविणारा, व त्याची काळजी घेणारा, आणि त्याच न्यायानें त्याला भोगसुखाचा चारा देणारा, परंतु त्यांच वेळी त्याच्याकडून शक्य तितकी अधिक मजुरी करून घेणारा - असा हिशेबी माणूस असतो. समाजाशी त्याचें आयुष्य एकजीव झालेले असले, तरी वस्तुतः तो त्यांत एकटाच असतो. नवऱ्याचें एक तंत्र सांभाळून, सासऱ्याच्या भरल्या खं. ४...१०