पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देशोद्धाराचा प्रश्न सोडविणारी चार प्रकारची मंडळी. २५ होते. या शिवाय चौथा एक वर्ग होता. या लोकांस आपली संस्कृति हीन वाटत नसे, अथवा यांचा स्वाभिमानही जवर होता. परंतु इंग्रजांसारखी भौतिक · साधनें व संपत्ति ही स्वतःच्या प्रयत्नांवर करतां येतील, व स्वतःच्या वज्रदे- हानें इंद्रजिताचें ब्रह्मास्त्र मारुतीनें ज्याप्रमाणे लटकें पाडलें, तसें आपल्या सुसं- घटितपणानें व स्वार्थत्यागानें, इंग्रजांचा दाब लटका पाडण्याची उमेद त्यांस होती. म्हणून त्यांनी सर्व प्रकारच्या आर्थिक चळवळी, स्वदेशी, बहिष्कार, व नाना प्रकारचे उद्योग यांजवर भर दिला होता. वासुदेवराव जोशी ऊर्फ सार्वज- निक काका हे या वर्गाचे द्योतक होत. अशा या निरनिराळ्या तऱ्हेनें प्रयत्न करणाऱ्या लोकांत त्या वेळेस एक सुशिक्षित गृहस्थ असा निघाला की, या सर्वच तऱ्हेनें प्रयत्न झाले पाहिजेत, असे त्यास वाटत होतें; आणि या सर्व तऱ्हेच्या प्रयत्नांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीतीनें उचलून धरण्याइतकी विशाल बुद्धी त्याचे ठिकाणी होती; म्हणून या सर्व तऱ्हेच्या प्रयत्नांना थोडीबहुत सुरु- वात करून, अथवा कोणी केलेल्या प्रयत्नांना सहाय्य करून महादेव गोविंदांन राष्ट्रजनकत्वाचा मान संपादितां आला. परंतु यांच्या प्रयत्नांत आणि व्यासं- गांत दोन मोठी व्यंगें होतीं. एकतर यांचें सर्व शिक्षण परकीय वातावरणांत झाल्यानें, आणि हें शिक्षण घेतांना आपल्या संस्कृतीविषयींचे निश्चित संस्कार कोणतेच नसल्यामुळे, आमचें राष्ट्रियत्व म्हणजे काय, व तें जर नष्ट झाले असेल तर, पुन्हा कशा रीतींनी त्याची उभारणी केली पाहिजे, या कल्पनाच त्यांच्या ठिकाणीं सिद्ध नव्हत्या. देश पारतंत्र्यांत पडला आहे, आणि सामा- जिक, नैतिक, औद्योगिक, धार्मिक असल्या अनेक बाबीत कांही भ्रामकपणानें व कांहीं खऱ्या रीतीनें, तो इंग्रजांच्यापेक्षां मार्गे आहे, ती स्थिति जाऊन दोघांची समान स्थिति व्हावी, म्हणजे अर्थातच राजकर्त्यांस भेद ठेवतां येणार नाहीं, एवढीच त्यांची कल्पना होती. यापलीकडे देशाच्या स्वातंत्र्याविषयी कांहीं विशेष आशा त्यांस होती, असे त्यांच्या चरित्रावरून दिसून येत नाहीं. इंग्रजी शिक्षणानें, अजिबात दिपून गेलेल्या वर्गांत व यांच्यांत फरक फारच थोडा होता. इंग्रजांपेक्षां आपण हीन स्थितींत आहों, परंतु प्रयत्न केले असतां इंग्रजांच्या बरोबरीची उन्नति संपादण्याची आपली योग्यता आहे, एवढेंच त्यांस जास्त वाटत असे. इंग्रजी राज्यकर्ते राजनीतिशास्त्रास अनुसरून आमची वाढ होण्याची खरी संधी आम्हांस केव्हांच