पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्रीय शिक्षणाचें आदिक्षेत्र. १५३ येते कीं, हल्लीं ज्याला आपण शिक्षण म्हणतों, मग तें सरकारी असो, अथवा राष्ट्रीय असो, कसेंही असो, त्यांत या अंतःशक्तीची वाढ करण्याचे साहित्य कितीही असले, तरी या शक्ति उत्पन्न करण्याची त्यांची योग्यता नाहीं. ह्या शक्ति उत्पन्न झालेला जीव त्याच्या कक्षेखाली आला, तर थोर्डेबहुत तें त्यास पोषक होते इतकेंच. याचे कारण असे दिसतें कीं, ज्या वयांत आपण लहान मुलांना सोडून देतों, किंबहुना त्यांचे मार्गे लागणें द्वांडपणाचें, असंभावितेचें अथवा रिकामटेकडेपणाचें समजतो, तेंच खरोखर या शक्तीचें प्रगट होण्याचें वय असते. झाल्या तर याच वयांत त्या उत्पन्न होतात, नाही तर पुढे कितीहि Instruction खात्यांत त्याला घातलेतरी काही उपयोग होत नाहीं. एकदां उत्पन्न झाल्यावर त्यांची वाढ वाटेल तशी करा. मग तो पुढे नास्तिक बनो, आस्तिक वनो. कर्मानुसार उन्नत होवो, अथवा अधःपातास जावो. या वयांत मुख्यत्वें, व पुढे ही पौगंडदशेपर्यंत थोडीबहुत, मुलांची वाढ होण्याचा राजमार्ग म्हटला म्हणजे 'अनुकरण.' अनुकरण द्वारा न कळत त्यांचे अंतःकरणांत रुजतें, त्याच खतांतून हीं रोपटी बाहेर पडतात. जेणेकरून तीं अशी बाहेर पडतील, व पडल्यावर समप्रमाणानें बाढून नैसर्गिक मगदुराप्रमाणे पूर्ण होतील, त्या पद्धतीचे नांव शिक्षण. या सूत्रमय विवेचनावरून 'मनुष्य' या नात्याने वाढ म्हणजे काय व ती संपादण्यास 'राष्ट्रीय शिक्षण' म्हणून म्हणतात तें कां व कसें असमर्थ आहे, हें थोडेसे लक्षांत येईल. तात्पर्य इतकेंच कीं कौटुंबिक जीवनक्रम आणि माणसामाणसांची खाजगी राहणी, हीं बदलली पाहिजेत. अशी शोगनगिरी करावयास समजदार माणसे आपण होऊन तयार झाल्याखेरीज कोणचीही चळवळ जीव धरणार नाहीं. सांप्रतच्या परिस्थितींत 'राष्ट्रीय शिक्षणा' के आदिक्षेत्र, उगवणारी पिढी नसून, उगवलेली आणि पालक पिढी आहे; आणि राष्ट्रीय शिक्षणाचें कार्य राजकारणांत नसून, या पिढ्यांना जबाबदारीचा आयुष्य क्रम स्वीकारावयास लावण्यांत, आणि वर सांगिल्याप्रमाणे त्यांची व उगवणान्य पिढीची वाढ होईल, अशा खाजगी व सामाजिक राहणीच्या नवीन परंपर उत्पन्न करून देण्यांत आहे. राष्ट्रीय शिक्षकांनी आपल्या शाळा कॉलेजच्य इमारतींत आणि व्याख्यानमंदिरांत न चालवितां, घरोघरीं घातल्या पाहिजेत.