पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ श्री ॥ तीन सांप्रदायिक आरत्या. आरती श्रीमहाराजांची. जयदेवा गुरुमूर्ति । नरसिंह सरस्वती ॥ • यतिवर्या दिनोद्धारा | ओवाळूं मंगलारती ॥ धृ० ॥ • मायागुण नियामका । परमात्मया व्यापका ॥ सच्चिदानंदकंदा | अद्वयास्वयंप्रकाशका ॥ १ ॥ ब्रह्माहरिमहेशा । नुमगसी तूं परेशा ॥ वेदशेषा मौन पडे । वर्णितां तव यशा ॥ २ ॥ गुरु क्षराक्षरातींत । आत्माराम तूं निश्चित ॥ विश्व हा विलास तूझा | ऐसे श्रुतिप्रणीत ॥३॥ जगदुद्धारासाठीं । अवतरसी या सृष्टीं ॥ अनन्य शरणागतां । तारिसी कृपा दृष्टी ॥ ४ ॥ बालोन्मत्त जड । स्थिति दाविसी उघड ॥ विदेहपणे विचरसी । निजरूपी अखंड ॥ ५ ॥ भक्तिज्ञान वैराग्य । स्वीकारिसी शांतियोग | भाविका बोध करिसी । हरिभक्ति महद्भाग्य ॥ ६ ॥ राधाकृष्ण स्वामीकृपें । भेटी देसी यतिरूपें ॥ निर्विकल्पे कवटाळितां । होय विष्णु दृश्यलोपें ॥ ७ ॥